Young farmer Success Story : कारले, स्वीट कॉर्न, लाल टोमॅटोच्या शेतीने तीन भावंडांना बनवले लखपती; जाणून घ्या कसं केलं नियोजन?

Young farmer Success Story
Young farmer Success Story
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Young farmer Success Story : सध्या नोकरी मिळणे तरुणांसाठी कठीण आहे आणि नोकरी मिळाली तरी तरुणांना एकदम तुटपुंज्या पगारावर नोकरी करावी लागते. यामध्ये तरुणांचा घर खर्च देखील भागत नाही शहरी भागातील वाढलेला खर्च आणि कमी पगार यामुळे तरुण वर्ग सतत चिंतेत असतो. त्यामुळे अनेक तरुण तर \नोकरीपेक्षा शेती करण्यास प्राधान्य देतात. अनेक तरुण वर्ग नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती करून चांगले उत्पन्न घेत आहे. सध्या देखील भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील डीएड झालेल्या स्वप्निल नंदनवार या तरुणाने शेती करून लाखो रुपये कमवले आहेत.

प्रगतशील शेतकरी स्वप्निलसह त्याच्या दोन भावंडांनी नोकरीसाठी अनेक धडपड केली मात्र त्यांना योग्य ती नोकरी मिळाली नाही यानंतर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि शेती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोन भावंडांनी स्वप्नीलच्या पुढाकारातून भाजीपाल्याची शेती सुरू केली. स्वप्निल, आशिष आणि अंकुश अशी या तिघा भावंडांची नावे आहेत. (Young farmer Success Story)

कस केल नियोजन?

या भावंडांचे शिक्षण झालं असल्यामुळे त्यांनी आधुनिक पद्धतीने तसेच नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला यांनी फक्त दीड एकर जागेवर विविध पिकांची लागवड केली यापैकी त्यांना काकडीच्या पिकाने चांगली कमाई करून दिली. त्यामुळे दोघांनी भाजीपाल्याची शेती अधिक तंत्रशुद्ध पद्धतीने करण्याचे ठरवले. त्यानंतर चार एकर शेतीत कारले, स्वीट कॉर्न, लाल टोमॅटोची शेती करत त्यांनी चांगला नफा कमवला आहे

पारंपारिक पद्धतीला फाटा देत त्यांनी नव्या जोमाने शेती सुरू केले आ. हे यामधील एक महत्त्वाची बाब म्हणजे आशिषला मार्केटिंगचे कौशल्य असल्याने तो आपला भाजीपाला कुठे आणि कसा विकायचा याचे नियोजन करतो. तर दोघे भावंडे म्हणजे स्वप्निल आणि अंकुश शेतातील सर्व कामाचे नियोजन करतात. त्यामुळे योग्य नियोजनामुळे त्यांना शेतीतून चांगला फायदा होत आहे. सध्या त्यांचे सर्वत्र कौतुक देखील केले जात आहे.

शेतमालाचे बाजार भाव कुठे पाहणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर शेतमालाचे बाजारभाव पाहिचे असतील तर जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही एका मिनिटात घर बसल्या तुमच्या शेतमालाचे बाजार भाव पाहू शकता. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावे लागेल. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही सर्व शेतमालाचे भाव पाहू शकता त्याचबरोबर शेतीविषयक तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला ती अडचण सोडवण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेच आपल्या मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप इन्स्टॉल करा.