Milk Rate: मोठी बातमी, शासनाकडून 5 रुपये अनुदानासहित, दुधाला प्रति लिटर 35 रुपये भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही दिवसात दुधाला योग्य भाव (Milk Rate) मिळावा म्हणून दूध उत्पादक शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू होते. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर आणि बटरच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याने आणि त्याचा परिणाम राज्यातील दूध खरेदी दरावर (Milk Rate) झाल्याने दूध उत्पादक शेतकरी (Dairy Farmers) आर्थिक अडचणीत आले होते. या समस्येवर तात्काळ उपाय योजना करण्यासाठी सरकारने (Maharashtra Government) त्वरित पाऊलं उचलावीत अशी मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री (Animal Husbandry and Dairy Minister) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सोमवारी राज्य भरातील सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलावली होती.

या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, राज्यातील सर्व खासगी (Private) आणि सहकारी दूध संघांनी शेतकर्‍यांना प्रतिलिटर 30 रुपये भाव (Milk Rate) देण्याचे निश्चित केले आहे. या सोबतच, शासनाकडून शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान सुद्धा दिले जाईल.

याचा अर्थ, आता शेतकऱ्यांना दुधाला प्रति लिटर 35 रुपये भाव (Milk Rate) मिळतील. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 50 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीला (Dairy Products Export) प्रोत्साहन देण्यासाठी, शासनाने राज्यातील दूध प्रकल्पांना प्रति किलो 30 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही अनुदानाची मर्यादा 15 हजार मॅट्रिक टनपर्यंत असेल.

याव्यतिरिक्त, शेतकऱ्यांची अनुदान (Subsidy For Farmers) प्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यात येणार आहे. ज्या शेतकर्‍यांचे अनुदान रखडले आहे त्यांच्यासाठी 15 जुलैपर्यंत शासनाच्या संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले की, “शासन राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि शेतकर्‍यांच्या दुधाला रास्त बाजारभाव (Milk Rate) मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास कटिबद्ध आहे.”