हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पुढच्या महिन्यापासून फळ छाटणीचे नियोजन करू लागला आहे. यंदाच्या हंगामात आटपाडी तालुक्यातील करगणी भागात अगाप फळ छाटणी सुरू केली असून सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून फळ छाटणीला सुरुवात होईल फळ छाटणी साठी बिहार उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातून बागेची काम करणारे 50 हजार मजूर दाखल होतील असा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितला आहे.
जिल्ह्यात द्राक्षाचे सरासरी सव्वा लाख एकर क्षेत्र आहे. काही भागात नव्या द्राक्षबागांची लागवड झाली आहे. त्यामुळे क्षेत्रात वाढ झाली आहे गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती आणि करोना विषाणू संकट सुरू होत आहे त्यातूनही शेतकऱ्यांनी बागेचे काटेकोर नियोजन करून उत्पादन घेतले आहे.
यंदाच्या द्राक्ष हंगामाची तयारी सुरू झाली आहे. वास्तविक पाहता मिरज पूर्व भागात आगाप छाटणीचे नियोजन केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे आगाप फळछाटणी घेतलेल्या बागांना फटका बसला आहे. त्यातच या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अति पावसाने या भागातील फळ छाटणी काही दिवसांनी लांबणीवर पडली असल्याचे चित्र आहे.
दरम्यान जिल्ह्यात 10 सप्टेंबर पासून मिरज तालुक्यापासून फळ छाटणी ला प्रारंभ होईल. त्यानंतर हळूहळू सर्व फळछाटणी करण्यात येईल. 10 नोव्हेंबरपर्यंत पलूस तालुक्यातील फळ छाटणी पूर्ण होईल सध्या द्राक्ष पिकास पोषक वातावरण यामुळे फळ छाटणी वेळेत पूर्ण होईल अशी शक्यता आहे. परंतु गतवर्षी फळ छाटणीच्या दरम्यानच पावसाने हजेरी लावली होती मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे द्राक्षाचा मोठं नुकसान झालं होतं.