हॅलो कृषी ऑनलाईन : अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास प्रो क्षेत्रामध्ये शेळी समूह योजना राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आता विदर्भात महा विकास आघाडी सरकारकडून शेळी समूह योजना राबवण्यात येणार आहे. या बरोबरच महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये अध्यासन केंद्र निर्माण करण्या करिता निश्चित केलेल्या धोरणासही मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत दिनांक 16 फेब्रुवारी रोजी घेण्यात आला.
या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारकडून शेळी समूह योजनेसाठी सात कोटी 81 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहेत पोहरा प्रमाणात राज्यातील उर्वरित पाच महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी समूह प्रकल्प राबविण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे राज्यातील शेळीपालनाचा व्यवसाय हा भूमिहीन ग्रामीण तसेच अल्पभूधारकांसाठी उपजीविकेचा महत्त्वपूर्ण साधन आहे. देशामध्ये शहरांच्या एकूण संख्येत महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर असून राज्यामध्ये उत्पादित होणाऱ्या दुधा पैकी दोन टक्के वाटा शेळीच्या दुधाचा आहे तसंच राज्यात एकूण उत्पादनाच्या बारा पॉईंट बारा टक्के एवढे उत्पादन शेळीच्या मासाचे होते.
शेळी मेंढी पालनाला चलाना
— या योजनेअंतर्गत शेळी पालकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
— तसेच उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत
— शेळी पालकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
— शेळ्यांचे दूध व दुग्धजन्य प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येणाऱ आहेत.
— शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र व निवास्थान सामूहिक सुविधा केंद्र स्थापन करण्याचा देखील सरकारचा मानस आहे.