हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो स्ट्रॉबेरी म्हंटलं की आपल्या नजरेसमोर एक लाल रंगाचं चिटुकलं फळं येतं . मात्र इस्त्राईल मधल्या एका शेतकरी कुटुंबाच्या शेतात ‘ जम्बो ‘ स्ट्रॉबेरी पिकवली आहे. त्याची उंची 18 सेंटीमीटर (सात इंच) लांब, जाडी चार सेंटीमीटर आणि 34 सेंटीमीटर परिघ होता . तसेच त्याचे वजन 289 ग्रॅम होते. विशेष म्हणजे आतापर्यंतची सर्वात वजनदार स्ट्रॉबेरी म्हणून त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे.
इस्त्रायलच्या मध्यवर्ती भागातील कादिमा-झोरान या शहरातील एरियल कुटुंबाच्या शेतात ही जम्बो स्ट्रॉबेरी पिकली आहे. ही स्ट्रॉबेरी इलान जातीची आहे. इस्रायलच्या कृषी संशोधन संस्थेने नीर दाईच्या मार्गदर्शनाखाली ती विकसित केली आहे. स्ट्रॉबेरीचे वजन पाहण्यासाठी दाई उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, यावर्षी थंडीचा हंगाम लांबला त्यामुळे फळांच्या आकारात चांगली वाढ झाली. स्ट्रॉबेरी फुलल्यानंतर 45 दिवसांहून अधिक काळ हळूहळू पिकते, परिणामी त्याचा आकार पूर्ण पिकल्यानंतर मोठा होतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
एरियल बंधूंनी सांगितले की त्यांना शुक्रवारी स्ट्रॉबेरीचा रेकॉर्डब्रेकर सापडला. त्यांनी पुढे सांगितले की, फळांच्या लागवडीच्या जवळपास चार दशकांत त्यांनी पाहिलेला हा सर्वात मोठा होता. त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात मोठी स्ट्रॉबेरी पाहिली आणि एक नवीन आव्हानकर्ता शोधला. त्यांनी शनिवारी रात्री गिनीज वेबसाइटवर दावा दाखल केला आणि दुसर्या दिवशी एका अधिकाऱ्याला साक्ष देण्यासाठी नोटरीला बोलावून फळ खराब होण्याआधी आणि त्याचा आकार कमी होण्याआधी वजन केले.