हॅलो कृषी ऑनलाईन : जगभरात जनुकीय सुधारित वाणांना जीएम मान्यता देण्यात आली आहे. मात्र भारतात फक्त कपाशीच्या bg1 आणि bg2 या जातींनाच मान्यता देण्यात आली आहे. इतर पिकांना कपाशीच्या तणनाशक रोधक, गुलाबी बोंड आळी रोधक, वाणांना मान्यता नाही. इतर पिकांमध्ये उत्पादन वाढ होणाऱ्या पाण्याचा ताण सहन करणाऱ्या, खारवट जमिनीत अधिक सरस उत्पादन देऊ शकणाऱ्या ,जनुकीय सुधारित वाण उपलब्ध आहेत. त्याचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सरकारने जीएम पिकांना परवानगी द्यावी ही मागणी करत शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने गुरुवारी श्रीगोंदा फॅक्टरी इथं प्रतिबंधित बीटी वांग्याची जाहिर लागवड करण्यात आली. स्वतंत्र भारतचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
गुरुवारी श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील अनिल घनवट यांच्या शेतात बीटी वांग्याची लागवड करण्याचे आंदोलन करण्यात आले. तर महाराष्ट्रातून आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यापूर्वी शेतकरी संघटनेतर्फे अकोला जिल्ह्यात तणनाशक विरोधक कपाशीची लागवड करून किसान सत्याग्रह केला होता.
बीटी वांग्याबरोबर सर्व जीएम पिके घेण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळाल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ग्राहकांना रास्त दरात अन्न मिळेल व देश समृद्ध होईल असा विश्वास यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे आणि व्यक्त केला या प्रसंगी सीमा नरोडे, सतिश दाणी, रामजीवन बोंदर, सुधीर बिंदू, मधुसूदन हरणे, विजय निवल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या