हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या महिन्यापासून शतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीजबिल कापणीच्या विरोधात अनेक संघटनांकडून आंदोलने केली जात आहेत. मात्र अद्यापही या प्रश्नाबाबत तोडगा निघालेला नाही. याच प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. राज्यातील बिजबिलाच्या मुद्द्यावरून महाविकस आघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला केला आहे. मुख्यमंत्री यांनी किती दिवस लुटारूच्या माघे उभे राहायचे याचा विचार करावा. कारखानदार, साखर आयुक्त त्यांच्या ताटा खालचे मांजर झाले आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि राज्य मंत्री हे दोघे ही बेकायदेशीर ऊसामध्ये कपाती करतात. मग न्याय मागायचा कुठे? असा सवाल केला आहे.
… ही स्वाभिमानीची फौज
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये कारखानदार यांच्या प्रतिकात्मक तिरडीचे दहन करण्यात आले. तसेच तिरडीला जोडे मारून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील विरोधीपक्षाची फौज नाही. पण ही स्वाभिमानीची फौज आहे. आम्ही रडणारे नाही लढणारे आहोत आणि आम्ही सांगितलेले आहे. संघर्षच करायचा असेल तर तारीख ठरवून करू, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.