हॅलो कृषी ऑनलाईन : काढणी, लावण , शेतीच्या कामाकरिता मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासते. सध्याच्या काळात मजुरांची टंचाई आणि मजुरांसाठी करावा लागणारा खर्च यापेक्षा शेतकरी यंत्रांद्वारे केल्या जाणाऱ्या कामांना प्राधान्य देताना दिसत आहेत. आधीचं लहरी निसर्ग आणि इतर गोष्टींमुळे शेतीचा खर्च परवडेनासा झाला आहे. कमी वेळात कमी खर्चात यांत्रिक शेतीला शेतकरी प्राधान्य देताना दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या लोहगावसह आसपासच्या ७ गावामध्ये सेहगल फाउंडेशनच्या वतीने कमी वेळात जास्त क्षेत्रावर ऊस लागवडीचा प्रयोग तसेच इतर शेतीप्रयोग करण्यात येत आहे.
सेहगल फाउंडेशनच्या वतीने गेल्या महिन्यापासून पंचवीस एकर खोडवा ऊस शेतात पाच पाचट कुटी,कीडनियंत्रण, विद्राव्य खत वाटप तसेच 25 एकर क्षेत्रात एकाचवेळी ऊस लागवड असे प्रयोग हाती घेत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुरुवार दिनांक १७ रोजी लोहगाव ढाकेफळ येथील तरुण शेतकरी काशिनाथ भवर, तुषार शिसोदे यांच्या शेतावर प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यावेळी सहयोग फाउंडेशनचा राज्य प्रमुख विष्णू खेडकर प्रकल्प समन्वयक योगेश शिंगारे