हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील लहान शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देत आजही देशातील शेतकरी खंबीरपणे उभा आहे. हे अनेकदा समोर येते… असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातही पाहायला मिळाला. येथील एका शेतकऱ्याने बैलाऐवजी घोडे शेतात नांगराला जुंपले आहेत.
महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील शेलगाव या गावातील भाऊराव धनगर या शेतकऱ्याने आपल्या शेतात नांगरणी करण्यासाठी घोड्यांचा वापर केला आहे. भाऊराव म्हणतात की त्यांच्याकडे बैलजोडी नाही. त्याचबरोबर नांगरणीमध्ये ट्रॅक्टर वापरण्याचा खर्च खूप जास्त आहे. याशिवाय डिझेलच्या दरानेही शतकी मजल मारली आहे. त्याच्याकडे ट्रॅक्टरची मदत घेण्याइतके पैसे नव्हते. याच काळात त्यांनी विचार केला.
शेतकरी आपला मुलगा आणि भावासह घोड्याच्या सहाय्याने शेत नांगरायला लागला. या शेतकऱ्यांचे घोडे नांगरणी व्यतिरिक्त इतर कामातही गुंतलेले आहेत.जसे की शेतातून घरी जाणे किंवा घरातून शेतात काही सामान आणणे. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे वेळेवर झाली. याशिवाय त्यांचा खर्चही वाचला. आता शेतकऱ्याच्या या अनोख्या प्रयोगाची चर्चा सर्व वाशीम जिल्ह्यात होत आहे.