अरे बाप रे! तब्बल 166 एकरावर केली गांजाची लागवड; खबर मिळताच अधिकारी पोहिचले बांधावर अन्…

Cannabis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी कधी कधी चुकीचा मार्ग अवलंबला जातो. हल्ली गांजाच्या शेतीबाबत अनेकदा माध्यमातून बातम्या समोर येताना दिसत आहेत. गांजाची शेती करण्याला कायद्याने मनाई आहे. मात्र असे असताना देखील तब्बल 166 एकरावर गांजाची लागवड केल्याची माहिती समोर आली आहे. होय … ! हे वाचून नक्कीच तुम्ही भुवया उंचावल्या असतील. पण ही तब्बल 166 एकरावर गांजाची शेती भारतात नाही तर स्पेनमध्ये केल्याचे आढळून आले आहे.

स्पेनमधल्या उत्तर भागातील नॅव्हारे प्रांतातील ग्रामीण भागात जवळपास 166 एकर जमिनीवर ही शेती केली जात होती. स्पॅनिश अधिकाऱ्यांनी ही सर्वात मोठी गांजाची लागवड नष्ट केली आहे. ज्याप्रमाणे भारतात गांजा लागवडीला मनाई आहे. त्याप्रमाणे स्पेन मध्ये केवळ औद्योगिक कारणाशिवाय गांजाची लागवड करण्यास मनाई आहे. असे असताना देखील तिथल्या एका शेतकऱ्याने 166 एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रावर गांजाची लागवड केली. मात्र स्पॅनिश अधिकाऱ्यांनी कारवाई करीत 100 दशलक्ष युरो किमतीची गांजाची शेती नष्ट केली आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेकडून देण्यात आले आहे. निद्रानाश आणि इतर आजारांवर उपचार करण्यासाठी कॅनाबिडिओलचा वापर केला जातो. जिथे पोलिसांनी छापा टाकला तिथे 50 टन गांजा कॅनाबिडिओलसाठी वळवला जात होता. तसे पाहता कॅनाबिडिओल ची विक्री आणि वापर युरोपच्या अनेक भागांमध्ये कायदेशीर आहे. मात्र, स्पेनमध्ये त्याचा वापर केवळ औद्योगिक कारणासाठी करण्यास परवानगी आहे.

याप्रकरणी स्पेन पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली आहे. या गाजांच्या शेतीची लागवड 2021 च्या मध्यापासून सुरू झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गार्डिया सिव्हिल फोर्सच्या म्हणण्यानुसार, शेताच्या मालकाने औद्योगिक हेतूंसाठी गांजाची लागवड करण्याची परवानगी घेतली होती. मात्र, इटली व स्वित्झर्लंडला बेकायदेशीरपणे निर्यात करण्यासाठी गांजाची लागवड करण्यात आली. या गांजाचा वापर कॅनाबिडिओल बनवण्यासाठी केला जात होता.