हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , एका शेतकऱ्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे ? असा प्रश्न शेतकऱ्यांना विचारला तर प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडातून एकच उत्तर येईल … माझं शेत , प्रत्येक शेतकऱ्यासाठी त्याचं शेत म्हणजे त्याचा जीव की प्राण असतो. ऊन, वारा, पाऊस कशाचीच पर्वा न करता शेतकरी शेतात राबत असतो. पण हल्ली कधी निसर्गाचा लहरीपणा, तर कधी सरकारचा कारभार यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होऊन बसले आहे. शेती म्हणजे जीव की प्राण असलेल्या अंजनाबाई यांनी कसायाला घेतलेला ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळाला याचा धक्का त्यांना सहन झाला नाही. यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
यंदा ऊस हंगाम चांगलाच लांबला आहे. अनेक कारखान्यांनी अद्यापही उसाची उचल केली नसल्यामुळे ऊस फडताच आहे. उसाला १५ महिने होऊनही ऊस फडतच शिल्लक होता. मात्र शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग लागली आणि कष्टाने पिकवलेला ऊस बघता बघता जाळून खाक झाला. अंजनाबाई हा धक्का सहन करू शकल्या नाही. ६५ वर्षीय अंजनाबाईंचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
अंजनाबाई अल्पभूधारक शेतकरी होत्या. 30 – 35 वर्षापूर्वी नवरा मांजरा नदीच्या पुरात दोन बैलांसोबत वाहून गेल्यानंतर अंजनाबाईं नी स्वत: शेती केली. अंजनाबाईंना सतत शेतात राबत असायच्या . शेतीच्या बळावर त्यांनी मुलं शिकवली. त्यांची मुलं आता शेतीच करतात. स्वताची शेती कमी असल्याने इतरांचं शेतही त्या करतात. मात्र या घटनेमुळे खरच व्यवस्थेला काही फरक पडेल का ? कारखान्याला काही फरक पडेल का ? असा प्रश्न उरतो. यंदाचा ऊस हंगाम लांबल्यामुळे राज्यात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांचा ऊस शेतात उभा आहे. शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. मात्र यामुळे नुकसान केवळ शेतकऱ्यांनाच सोसावे लागत आहे. यव्यस्थेचे डोळे मात्र बंदच आहेत. व्यवस्थेचे डोळे कधी उघडणार असा सवाल उपस्थित केला जातो आहे.