‘या’ तारखेपर्यंत मान्सून होणार कोकणात दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. दक्षिणेकडून प्रवास करत मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे. नियोजित वेळेपेक्षा सहा दिवस आधीच मान्सूनचे वारे सक्रीय झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मान्सून केरळमध्ये तर 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. मान्सूनच्या अगोदरच केरळमध्ये पाऊस दाखल झाला आहे. केरळमध्ये अनेक ठिकाणी पूरसृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. केरळवर सध्या आलेले ढग मोठ्या आकाराचे आहेत. या ढगांमुळे मोठा पाऊस पडन्यायाची शक्यता आहे.

राज्यात या दिवशी दाखल होणार पाऊस

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो. तर 12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. यंदाही महाराष्ट्रात मान्सून दरवर्षीप्रमाणे पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान विभाग पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख अनुराग कश्यपी यांनी सांगितले.

बिहारमध्ये मोठा पाऊस

भारतातील मान्सूनच्या पावसामुळे हवामानात बदल होऊ लागला आहे. यासंदर्भात हवामान खात्याचे म्हणणे आहे की, बिहारमधील हवामान बदलामुळे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!