‘… माझ्याकडून त्यांना 2 घरं, आजच भूमीपूजन’, मेळघाटात अब्दुल सत्तारांची क्विक ऍक्शन ; वाचा नेमकं काय घडलं ?

abdul sattar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राजकीय डायलॉगबाजीसाठी प्रसिद्ध असलेले अब्दुल सत्तार यांनी सध्या शिंदे सरकारच्या कृषी मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमाला आजच सुरुवात करण्यात आली असून काल रात्री कृषी मंत्र्यांनी तिथल्या शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम केला होता. दरम्यान राज्यभरात काल पावसाने हजेरी लावली. सत्तार ज्या शेतकऱ्यांच्या घरी थांबले होते तिथे पाणी गळत होते. त्यानंतर सत्तारांनी तत्काळ… माझ्याकडून या दोन्ही शेतकऱ्यांना चांगली घरं बांधून मिळतील, असं आश्वासन दिलं.

केवळ आश्वासन देऊन ते थांबले नाहीत तर आज गुरुवारी सकाळी लगेच जमिनीचं मोजमाप सुरु झालं आणि त्याचं भूमीपूजन करणार असल्याचंही सत्तारांनी जाहीर केलं.. त्यामुळे मेळघाटात कृषीमंत्र्यांच्या दौऱ्याची सध्या चांगलीच हवा झाली आहे.

बुधवारी रात्री ते अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाटमधील साद्राबाडी या गावात पोहोचले. येथील चुन्नीलाल पटेल यांच्या घरी त्यांनी अत्यंत साधेपणाने रानभाजी आणि भाकरीचा आस्वाद लुटला. तर सुनील धांडे यांच्या घरी मुक्काम केला. शैलेंद्र सावलकर यांच्याही घरी त्यांनी भेट दिली. सुनील धांडे आणि शैलेंद्र सावलकर यांची घरं रात्री गळत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना माझ्याकडून घरं बांधून देणार, असं आश्वासन सत्तारांनी दिलं. आज त्याचं भूमीपूजनही होणार आहे. त्यांच्या मुलीच्या लग्नाला देखील येणार असल्याचं सत्तारांनी सांगितलं.