Soybean Market Price : किती मिळतोय सध्या सोयाबीनला भाव ? काय आहे बाजारातील आवक ? जाणून घ्या

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, कमी वेळेत अधिक चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती सोयाबीनला (Soybean Market Price) आहे. मागच्या दोन वर्षात सोयाबीनला चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कल सोयाबीन उत्पादन घेण्याकडे आहे, यंदाच्या खरिपाटाही सोयाबीनची चांगली लागवड झाली आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे सोयाबीनवर विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

दरम्यान, आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला (Soybean Market Price) सर्वाधिक कमाल 6301 रुपयांचा भाव मिळालेला आहे.

हा भाव धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून या बाजार समितीमध्ये आज केवळ सात क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 5100 रुपये, कमाल भाव 6301 आणि सर्वसाधारण भाव 5100 रुपये इतका मिळाला आहे.

अवके बद्दल बोलायचं झाल्यास आज सर्वाधिक आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत (Soybean Market Price) झाली असून ही अवक 2455 क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाव 5150, कमाल भाव 5464 आणि सर्वसाधारण भाव 5350 रुपये इतका मिळाला आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
07/09/2022
माजलगाव क्विंटल 79 4500 5099 4900
चंद्रपूर क्विंटल 10 4850 4850 4850
कारंजा क्विंटल 1800 4750 5255 5075
परळी-वैजनाथ क्विंटल 185 4975 5250 5125
अमरावती लोकल क्विंटल 1941 4700 5135 4917
नागपूर लोकल क्विंटल 201 4572 5300 5118
अमळनेर लोकल क्विंटल 2 4800 5100 5100
हिंगोली लोकल क्विंटल 140 4800 5210 5005
मेहकर लोकल क्विंटल 320 4400 5160 4800
लातूर पिवळा क्विंटल 2455 5150 5464 5350
धर्माबाद पिवळा क्विंटल 7 5100 6301 5100
जालना पिवळा क्विंटल 215 4600 5111 5050
अकोला पिवळा क्विंटल 692 4500 5225 5190
यवतमाळ पिवळा क्विंटल 153 4850 5150 5000
चिखली पिवळा क्विंटल 104 4650 5000 4825
बीड पिवळा क्विंटल 5 4950 5000 4975
वाशीम पिवळा क्विंटल 1500 4600 5300 5000
पैठण पिवळा क्विंटल 2 4900 4900 4900
भोकर पिवळा क्विंटल 2 4000 5159 4580
अजनगाव सुर्जी पिवळा क्विंटल 70 4500 5050 4800
गेवराई पिवळा क्विंटल 6 4880 4931 4880
परतूर पिवळा क्विंटल 4 4500 5115 5000
गंगाखेड पिवळा क्विंटल 11 5200 5300 5200
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 1 4500 4500 4500
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 120 4600 5309 5150
केज पिवळा क्विंटल 7 4666 5117 5050
मुरुम पिवळा क्विंटल 40 5001 5104 5053
काटोल पिवळा क्विंटल 17 3511 5001 4500