Tur Market Price : सोयाबीनपेक्षा तुरीला बाजरात भाव अधिक ; पहा आज मिळाला किती रुपयांचा भाव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचे बाजारातील भाव पहिले असता सोयाबीनपेक्षा तुरीला (Tur Market Price) चांगला भाव मिळताना दिसून येतो आहे. सध्या सोयाबीनचे दर ५००० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर तुरीचे दर सात हजार रुपयांच्या टप्प्यात आहेत.

दरम्यान आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील तूर बाजार भावानुसार आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला (Tur Market Price) सर्वाधिक 7595 रुपयांचा कमाल भाव मिळालाय.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 426 क्विंटल लाल तुरीची आवक झाली. याकरिता किमान भाव 5500, कमाल भाव 7595 आणि सर्वसाधारण भाव सात हजार रुपये इतका मिळाला.

सध्याचे बाजार भाव बघता तुरीची आवक ही कमी दिसून येत आहे. मात्र तुरीला (Tur Market Price) चांगला भाव त्या तुलनेत मिळताना दिसत आहे. सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक 428 क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाग 6100 रुपये, कमाल भाव 7500 आणि सर्वसाधारण भाव सात हजार रुपये इतका मिळाला आहे.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
06/10/2022
उदगीर क्विंटल 65 7500 7900 7700
रामटेक क्विंटल 5 6300 6400 6350
लातूर लाल क्विंटल 428 6100 7500 7000
अकोला लाल क्विंटल 426 5500 7595 7000
अमरावती लाल क्विंटल 3 7000 7350 7175
यवतमाळ लाल क्विंटल 54 6390 7350 6870
चिखली लाल क्विंटल 4 5800 6851 6325
नागपूर लाल क्विंटल 20 7000 7201 7150
वाशीम – अनसींग लाल क्विंटल 60 6950 7100 7000
गंगाखेड लाल क्विंटल 2 7000 7100 7000
काटोल लोकल क्विंटल 3 7001 7001 7001
माजलगाव पांढरा क्विंटल 2 6000 6000 6000
बीड पांढरा क्विंटल 4 5500 6750 6749
error: Content is protected !!