Soyabean Rate Today : सोयाबीनचे दर नव्या वर्षात वाढले की घसरले? चेक करा बाजारभाव

Soyabean Rate Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी आॅनलाईन : शेतकरी मित्रांनो यंदा सोयाबीनची आवक जास्त झाली आहे. मात्र सोयाबीनला म्हणावा तसा दर (Soyabean Rate Today) मिळाला नाही. मागच्या वर्षी दरात मोठी चढ उतार पाहयला मिळाली होती. पण यंदा दर सुरवातीपासून स्थिर असल्याचे दिसत आहेत. सर्वसाधारणपणे सोयाबीनला 5000 रुपये बाजारभाव मिळत आहे. नव्या वर्षात सोयाबीनचे दर वाढले की घसरले हे आज आपण पाहुयात.

आज कारंजा कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक 5000 क्विंटल इतकी आवाक झाली. त्यानंतर वाशिम बाजारसमितीत सोयाबीनची एकुण आवक 4500 क्विंटल झाली. आज दिवसभरात सर्वात कमी आवक आष्टी – जालना बाजारसमितीत झाल्याची नोंद झाली आहे. Soyabean Rate Today

नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार आज सोयाबीनला सर्वाधिक बाजारभाव हिंगोली जिल्ह्यातील आखाडाबाळापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये मिळाला. तब्बल 5 हजार 500 रुपये बाजारभाव मिळाल्याने हिंगोलीतील शेतकर्‍यांची नव्या वर्षाची सुरवात चांगली झाली. तर सर्वात कमी बाजारभाव उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम येथे मिळाला. मुरुम बाजारसमितीत सोयाबीनला आज 5050 रुपये भाव मिळाला. Soyabean Bajarbhav