Soyabean Rate : राज्यात आज इथे झाली सोयाबीनची सर्वाधिक आवक; बाजारभाव तपासा

Soyabean Rate Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Bajar Bhav : राज्यात आज सोयाबीनची (Soyabean Rate) मोठी आवक झाल्याचे पहायला मिळाले. काल रविवारमुळे सोयाबीनची आवक फार कमी झाली होती. मात्र आज सोमवारी राज्यात सोयाबीन बाजारात चांगली उलाढाल झाली. दिवसभरात राज्यात आज कारंजा शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक 4000 क्विंटल इतकी आवक झाली. याखालोखाल वाशीम येथे 3000 क्विंटल तर अहमदपूर येथे 2100 क्विंटल आवक नोंद झाली.

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात परतूर आणि तुळजापूर येथे राज्यातील सर्वात जास्त दर मिळाला. तुळजापूर येथे कमीत कमी 5000 रुपये तर जास्तित जास्त 5225 रुपये प्रति क्विंटल इतका रेट सोयाबीनला मिळाला. तसेच परतूर शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला कमीत कमी 5000 रुपये तर जास्तित जास्त 5237 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. देऊळगाव राजा येथे सोयाबीनला सर्वात कमी 4800 रुपये इतका दर मिळाला आहे.

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

फेब्रुवारी महिन्यात वाढतील दर?

राज्यात सध्या सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचे दर वाढतील असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सध्या सोयाबीन तेलाचे साठे निर्माण झाल्याने दर स्थिर आहेत. मात्र पुढील महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्यात आयात शुल्काबाबत मोठे फेरफार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोयाबीनच्या दरमध्येही फरक पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/01/2023
कारंजाक्विंटल4000487553105190
तुळजापूरक्विंटल85500052255200
धुळेहायब्रीडक्विंटल6508050805080
सोलापूरलोकलक्विंटल168504052855100
नागपूरलोकलक्विंटल592450051905018
हिंगोलीलोकलक्विंटल800459952354917
मेहकरलोकलक्विंटल1650430052004800
ताडकळसनं. १क्विंटल120515052505175
जळकोटपांढराक्विंटल321480052005000
वाशीमपिवळाक्विंटल3000475052515000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल1200495052505150
भोकरपिवळाक्विंटल139490051795040
परतूरपिवळाक्विंटल55500052375200
देउळगाव राजापिवळाक्विंटल32450050254800
वरोरापिवळाक्विंटल183471151254900
दिंडोरीपिवळाक्विंटल52465051515000
अहमहपूरपिवळाक्विंटल2100500052655132
उमरीपिवळाक्विंटल37505051505100
उमरगापिवळाक्विंटल50460051505000
पालमपिवळाक्विंटल28490051004950
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल101475052005000
आष्टी-जालनापिवळाक्विंटल10503051505030
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल90470051505050