जालना प्रतिनिधी । मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्रात अगोदरच शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाणे कंपनी आणि महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले परिणामी शेतकऱ्यांना एकदा-दोनदा तर काही ठिकाणी तिसऱ्यांदा पेरणी करावी लागली आहे. असे असताना खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुन्हा एकदा शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांनी या हंगामात घेतली जाणारी कापूस मूग उडीद सोयाबीन मका मिरची यासारखे अनेक पिके नष्ट झाली आहेत. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठवा अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्राद्वारे विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
मराठवाड्याचा महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाला आलेली फुले व कार्य पूर्णतः गळून पडले असून कापसाच्या उत्पादनावर त्याचा खूप मोठा परिणाम दिसून येणार आहे. त्याचबरोबर मूग या पिकाच्या शेंगा पूर्णपणे सरून गेल्या असून काही शेंगांना झाडावरच फुटलेले आहेत. हीच अवस्था उडीद सोयाबीन मका या पिकांची देखील झालेली आपणास दिसून येईल मक्याचे पीक देखील पूर्णपणे भुईसपाट झालेले आहे परिणामी खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अत्यल्प उत्पादन शेतकऱ्यांना होणार आहे असेही लोणीकर यांनी विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.