सरकारी योजना : ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 33 कोटी; बीनव्याजी पीक कर्ज उपलब्ध, जाणून घ्या

सरकारी योजना
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार आणि राज्य सरकार बऱ्याचदा शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी आणि सबलीकरणासाठी योजनेच्या माध्यमातून मदत करत असते. या योजनेतून शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो. या योजनेपैकी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. या योजनेअंतर्गत ३ लाखांपर्यंत बीनव्याजी पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जात होतं. या योजनेमुळे लाभार्थ्यांचे अनुदान प्रलंबित केलं जात होतं. अनुदानापोटी 33 कोटी 98 लाख रुपये जमा होणार आहेत. यामुळे हंगामापूर्वीच शेतकऱ्यांची पाचही बोटं तुपात पहायला मिळत आहेत. लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

2 लाख 67 हजार 256 शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा

डॉ. पंजाबराव देशमुख या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा २०१८ – १९ तसेच २०२० – २१ या तीन वर्षांचा व्याज परतावा प्रलंबित होता. हे अनुदान ३३ कोटी ९८ लाख रुपये एवढे असून २ लाख ६७ हजार २५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

सरकारी अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

डॉ. पंजाबराव देशमुख योजनेत सुरुवातीला एक लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजदराने मिळत असून या मर्यादेत बदल होऊन ३ लाख करण्यात आली. यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक मोठा निर्णय घेतला. २०२२ – २३ पासून हे व्याज पाच लाख रक्कमेवर शून्य टक्के व्याजदर आकारले जाणार असल्याची माहिती समोर आली. २०२२ – २३ पासून ही अंमलबजावणी केल्याने त्याचा लाभ पुढील वर्षीपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे.

असा करा मोबाईलवरून पीक विम्याला अर्ज

शेतकरी मित्रांनो सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही सेवा केंद्रात जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. Hello Krushi या मोबाईल अँपवरून तुम्ही स्वतः आता कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करू शकता. शिवाय रोजचा बाजारभाव, जमीनीचा सातबारा, जमिनीची मोजणी, हवामान अंदाज आदी सेवाही इथे मोफत मध्ये उपलब्ध आहेत. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इंस्टाल करून घ्या.

या शेतकऱ्यांना योजनेचा होणार लाभ

३ लाखांपर्यंत रक्कमेवर शून्य टक्के व्याजदराने पीककर्ज आकारले जात आहे. हे केवळ डॉ. पंजाबराव देशमुख या योजनेअंतर्गत झाले. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँका, ग्रामीण बँका, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँकांच्या माध्यमातून कर्ज वाटप केलं जात असून पीक कर्ज घेण्यापासून ३६५ दिवस म्हणजे काटेकोरपणे १ वर्षात कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यात येतो.