हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात एक महिन्याहून अधिक दिवस होऊन गेले मात्र अवकाळी पाऊस थांबायचं नाव घेत नाही. राज्यात एप्रिल महिन्यात २८,२९,३० या तारखेला विजांसह वादळी वारा आणि गारपिटीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भ या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. इतर भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तुमच्या गावात गारपीट होणार का कसे चेक करायचं?
राज्यात एक महिन्याहून अधिक दिवस झाले तरीही अवकाळी पाऊस थांबायचं नाव घेईना. अशा परिस्थितीत आपल्या गावात, जिल्ह्यात, तालुक्यात पाऊस होणार का? गारपीट होणार का हे आता अगोदरच चेक करणे शक्य झाले आहे. आपल्या गावातील हवामानाचा अचूक अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये Hello Krushi हे मोबाईल अँप असणे गरजेचे आहे. आजच गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi असे सर्च करा आणि ॲप इंस्टॉल करा. हवामान अंदाज नावाचा पर्याय येईल त्यावर क्लिक करून एका सेकंदात हवामानाची माहिती मिळू शकते. तसेच जमीन मोजणी, पशुपालन, बाजारभाव, सातबारा, कृषी योजना याबाबत माहिती एकही रुपये खर्च न करता मिळू शकते.
जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा या भागात ऑरेंज अलर्ट जारी :
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड.
विदर्भ : अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया.
वादळी पावसाचा इशारा या भागात येलो अलर्ट जारी :
मध्य महाराष्ट्र, : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर.
मराठवाडा : धाराशिव, लातूर.
विदर्भ : बुलढाणा, वाशीम, अकोला, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.