Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रासाठी पुढील 3 दिवस धोक्याचे; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Panjabrao Dakh Havaman Andaj) : राज्यात मार्च आणि एप्रिल हे दोन महिने उलटून गेले तरी अवकाळी पाऊस थांबायचं नाव घेत नसल्याचे चित्र आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे. साधारणपणे १० मे पर्यंत राज्यात वादळी पाऊस होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच आता तारीख ४,५,६ या दिवशी राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच तारिख ६,७,८, या दिवसात कोंकण भागात, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, आटपाडी, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डंख यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

तारीख ९ ते १५ मेपर्यंत राज्यातील हवामान हे कोरडे राहणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र १७,१८,१९ मेमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता पहायला मिळत आहे. त्यानंतर २१ आणि २२ मे या दिवशी हवामान कोरड राहणार असून पुन्हा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यामध्ये कोंकण भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात गारपिटीसह विजांचं सावट आहे. यामुळे जनावरांचे संरक्षण करावे. Panjabrao Dakh Havaman Andaj

आपल्या गावातील अचूक हवामान अंदाज कसा मिळवावा?

शेतकरी मित्रांनो आता आपल्याला आपल्या गावात सोसाट्याचा वर, अवकाळी पाऊस होणार का याची माहिती एक दिवस अगोदरच मिळणे शक्य झाले आहे. हॅलो कृषी या मोबाईल अँपच्या मदतीने लाखो शेतकरी प्रगत शेती करून आपला नफा कित्तेक पटींनी वाढवत आहेत. तुम्हीसुद्धा आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्या. इथे सातबारा उतारा, जमीन मोजणी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री, हवामान अंदाज, बाजारभाव अशा अनेक सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जातात.

आज पासून जनावरे शेतात न बांधता सुरक्षित ठिकाणी बांधावीत. ही जनावरे चुकूनही झाडाखाली बंधू नये. जेणेकरून गारपीट, वीज, अवकाळी पावसाचा परिणाम त्या जनावरांवर होऊ शकतो. यामुळे जानवरांची आणि स्वतःची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे.

error: Content is protected !!