Agriculture Technology । आपल्याकडे सतत बोललं जात शेतकऱ्याचा नाद करू नये, कारण तो उभ्या जगाचा पोशिंदा आहे. बरेच शेतकरी (Farmer ) शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान राबवून बाकी शेतकऱ्यांसाठी एक उदाहरण बनले आहेत. शेतात काम करताना खूप कष्ट करावे लागते मात्र आपले काम कमी व्हावे यासाठी शेतकरी अनेक जुगाड करत असतात. सध्या देखील एका शेतकऱ्याने केलेल्या जुगाडाची चर्चा होताना दिसत आहे. (Latest News)
सर्वात स्वस्त शेती उपकरणे कुठे मिळतात?
आता शेतकऱ्यांना अतिशय कमी दरात शेतीउपयोगी उपकरणे मिळत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना गुगल प्ले स्तवरावरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप अतिशय उपयोगी ठरत आहे. येथे महाराष्ट्रातील अनेक दुकानदार आपल्याकडील शेतीउपयोगी उपकरणे होलसेल दरात विक्री करतात. तेव्हा तुम्हाला स्वतःचा फायदा करून घ्यायचा असेल आणि पैशांची बचत करायची असेल तर आजच खालील हिरव्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून किंवा गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा.
बरेचजण आता फवारणी करताना ट्रॅक्टरचा वापर करतात मात्र अकोला (Akola) जिल्ह्यातील तेल्हारा दानापूर या गावातील दिनेश विखे या शेतकऱ्यानं एक अनोख जुगाड केलं आहे. या शेतकऱ्याने पाठीवरचे दोन चार्जिंग पंप वापरून जुगाड केले आहे. त्यामुळे सर्वत्र या शेतकऱ्याची चर्चा होताना दिसत आहे. (Crop spraying)
नेमकं कस केलं जुगाड? Agriculture Technology
हे जुगाड बनविण्यासाठी शेतकऱ्याने शेतीमध्ये फवारणीसाठी वापरले जाणारे दोन डबल बॅटरी असलेले हाय प्रेशर पंप घेतले आहेत. यामधील एका पंपाची किंमत ३४०० रुपये आहे. पिकामध्ये अंतर कमी जास्त असते त्यामुळे हे जुगाड सर्व पिकांना वापरण्यात यावे म्हणून शेतकऱ्याने ट्रॅक्टरच्या फवारणी यंत्राला वापरतात ती नळी वापरली त्यामुळे आता जसे पाहिजे तसे त्याला आपण ऍडजस्ट करून कमी जास्त अंतर सेट करता येतं.
या यंत्राने फवारणी करण्यासाठी दोन माणसे लागतात. हे यंत्र वजनाने एकदम हलके आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा हात दुखण्याचा प्रश्न देखील उद्भवत नाही. त्यामुळे दोन शेतकरी अगदी सहजरित्या हे यंत्र हाताळू शकतात. सोयाबीन हरभरा या पिकांची उंची चार फुटा पेक्षा कमी आहे अशा सर्व प्रकारच्या पिकांमध्ये फवारणी करण्यासाठी आपल्याला या जुगाडाचा वापर करता येऊ शकतो. Agriculture Technology
शेतकऱ्याने केलेल्या या जुगाडाची आता सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. शेतकऱ्याचे हे जुगाड पाहण्यासाठी दूरवरून लोक येत आहेत. अनेक लोक त्यांचे कौतुक करत आहेत. या जुगाडाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हे व्हिडीओ पाहून देखील त्या पद्धतीचं जुगाड बनु शकता.