Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात आता सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मागील तीन दिवस कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपले. यामध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळणे, भूस्खलन अशा घटना घडल्या. आता आज पासून पुढचे ५ दिवस मराठवाडा आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज दिला आहे. यांनुसार आजपासून म्हणजे २५ जुलै पासून ३० जुलै पर्यंत विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खासकरून हा अंदाज विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी असल्याचं पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे. दि. 25 ते 30 जुलै या दरम्यान विदर्भ व मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की या चार ते पाच दिवसात विदर्भ व मराठवाड्यात पडणारा पाऊस सर्वदुरू नसणार आहे. मात्र सगळीकडे पडणार आहे असे डख यांनी सांगितले आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj
कोणकोणत्या जिल्ह्यात होणार पाऊस?
यवतमाळ, हिंगोली, वाशिम, अकोला, परभणी, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती, बुलडाणा, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, संभाजीनगर, जालना जिल्ह्यांमध्ये तर अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात हा पाऊस पडणार आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडणार आहे. हा पाऊस जास्त विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पडणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हा पाऊस पूर्वेकडून येणार आहे. त्यामुळे नांदेड, यवतमाळ, परभणी, लातूर, बीड, जालना, सोलापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये जास्त पडणार आहे. अचानक वातावरणात बदल झाल्यास शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती देण्यात येईल.