Mini Tractor : नाद करा पण आमचा कुठं! शेतकऱ्याने चक्क मोटारसायकलचा युट्युबवर पाहून बनवला मिनी ट्रॅक्टर

Mini Tractor
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mini Tractor : सध्या शेतीमध्ये अनेक मोठे बदल झालेले पाहायला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात शेतीमध्ये खूप मोठे बदल होत आहेत. पूर्वी कोणतेही यंत्र नसल्याने लोक अंग मेहनतीने पूर्ण शेती करायचे. मात्र जसे जसे बाजारात यंत्र उपलब्ध होऊ लागले तसे शेतीची कामे देखील सोयीस्कर होऊ लागली आहेत. यंत्रामुळे शेतीची कामे देखील झपाट जलद होऊ लागली आहेत. अगदी कमी वेळामध्ये जास्त काम यंत्रामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत देखील कमी लागत आहे.

शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो या समस्यांचा विचार करून अनेकजण काहीतरी नवीन जुगाड बनवत असतात. अशा आपण अनेक बातम्या देखील पाहिलेल्या असतात. दरम्यान शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता आता राहता तालुक्यातील गोंडेगाव येथील शेतकरी पुंडलिक बळवंत भवार यांनी एक अनोखे यंत्र बनवले आहे. या शेतकऱ्याने शेतीची अंतर्मशागतीची कामे करण्यासाठी जुन्या मोटरसायकलचा वापर करून चक्क मिनी ट्रॅक्टरचा भाग जोडून तीन चाकी यंत्र बनवले आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे अगदी कमी खर्चात या यंत्राच्या मदतीने अनेक कामे पार पडत आहेत. त्यांनी हे यंत्र यूट्यूबच्या माध्यमातून बनवले असल्याचे सांगितले आहे. (Desi Jugad)

Bike Tractor | Three Wheel Mini Tractor | तीन चक्र का  मिनी ट्रैक्टर  | Discover Agriculture

मजुरांचा वाचतोय खर्च

शेती करताना शेतकऱ्यांना मजुरांना देखील मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. मात्र आता या यंत्रामुळे मजुरीचा खर्च देखील वाचणार आहे. कारण या यंत्रामुळे खुरपणी, कोळपणी इतर अंतर्मशागतीची कामे केली जाणार आहेत, आपण जर मजुरीच्या खर्चाचा विचार केला तर मजुरीला तीनशे ते चारशे रुपये पर्यंत खर्च येतो. परंतु हे काम जलद गतीने देखील होत नाही. मात्र आता या यंत्रामुळे जलद गतीने काम होणार आहे.

यंत्र बनवायला किती खर्च आला?

या शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना हे यंत्र बनवण्यासाठी एकूण 40 ते 50 हजार रुपये खर्च करावे लागले आहेत. या यंत्राची खासियत म्हणजे हे यंत्र वजनाने खूप हलके असल्याने आपण त्याला एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये अगदी सहजपणे नेऊ शकतो त्यामुळे पिकांचे देखील नुकसान होत नाही. मागच्या तीन वर्षापासून त्यांनी या यंत्राच्या सहाय्याने हजारो एकर क्षेत्राची कोळपणी आणि आंतरमशागतीची कामे केली आहेत.

Sanedo Rajdoot bike modifyde jugad santi ,mini tra

या ठिकाणाहून खरेदी करा शेतकऱ्यांनी बनवलेली जुगाडे

शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेती संबंधित कोणतीही जुगाडे खरेदी करायचे असतील तर यासाठी प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. हे ॲप इंस्टॉल केल्यावर त्यामध्ये शेतकरी दुकान या ऑप्शनवर सिलेक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या जुगाडांची माहिती पाहू शकता. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच हे ॲप इन्स्टॉल करा.

यंत्राची वैशिष्ट्ये नेमकी काय?

या शेतकऱ्याने राजदूत कंपनीच्या 125cc इंजिन क्षमता असणाऱ्या मोटरसायकलचा मिनी ट्रॅक्टर बनवला आहे. याला पाचफणी कोळपे बसवले आहे. त्यामुळे शेतीमधील पिकांचे अंतर्मशागतीची कामे सहज केली जात आहे. हे यंत्र अत्यंत कमी खर्चिक आहे त्याचबरोबर वजनाने हलके असल्याने ते कुठेही घेऊन जात येते.