Kantola Farming : शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! तुम्हीही कंटोला शेती करत असाल तर जाणून घ्या ‘या’ रोगाबद्दल, नाहीतर होईल मोठे नुकसान…

Kantola Farming
Kantola Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kantola Farming : भारतात कंटोला ही एक खास प्रकारची भाजी आहे, ज्याची मुळे, पाने, फळे हे सर्व खूप फायदेशीर आहे, त्याचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. सध्या याची लागवड करून अनेकजण चांगले पैसे देखील कमावत आहेत. कांटोलाच्या देठात औषधी गुणधर्म असतात, ज्याचा उपयोग औषधे बनवण्यासाठी केला जातो. ही औषधी वनस्पती असल्याने याला बाजारात मोठी मागणी असते त्यामुळे भाव देखील चांगला मिळतो. आज आपण कंटोलाला होणाऱ्या रोगाबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल माहिती.

१) बुरशी रोग

हा बुरशीमुळे होणारा रोग आहे. या रोगात झाडाची पाने पांढरी होऊन हळूहळू पावडरसारखी दिसू लागतात. जेव्हा हा संसर्ग जास्त होतो तेव्हा पाने गडद पिवळी पडतात आणि गळू लागतात. त्यामुळे तुम्ही वनस्पतीची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे नाहीतर तुमचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने योग्य तो सल्ला घेणे गरजेचे आहे.

२) गंज रोग

कंटोलामध्ये गंज रोगाचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो. गंज हा एक प्रकारचा बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे झाडांच्या पानांवर गडद पिवळे ठिपके तयार होतात आणि जसजसा संसर्ग वाढत जातो तसतसे डाग मोठे होऊन संपूर्ण झाडावर पसरतात. हे डाग लाल, तपकिरी आणि पिवळ्या रंगाचे असतात.

३) रूट रॉट

रूट रॉट हा एक प्रकारचा जिवाणू संसर्ग आहे जो कंटोलामध्ये असतो, हा जीवाणू झाडाच्या मुळांमध्ये पसरतो. हा जीवाणू वनस्पतींमध्ये जास्त ओल्या मातीमुळे किंवा खराब निचऱ्यामुळे तयार होतो, तर या रोगात झाडाची मुळे कोमेजून पडतात आणि कुजतात.

४) वनस्पतीच्या पानांचे ठिपके रोग

वनस्पतीच्या पानांचे ठिपके रोग हा एक बुरशीजन्य रोग आहे जो कांटोलाच्या फळांचे नुकसान करतो. यामुळे तुकम्ह्णा उत्पादनात मोठी घाट होण्याची देखील शक्यता असते. हे भाज्यांसह वनस्पतीच्या सर्व भागांवर परिणाम करू शकते. हा रोग झाडाच्या पानांपासून सुरू होतो आणि संपूर्ण झाडामध्ये पसरतो. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.