पुढील ५ दिवस हवामान कोरडे राहील; हवामान खात्याने वर्तवली शक्यता

Weather Report
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | उत्तर महाराष्ट्रात पुढील ५ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवले आहे. 19 जानेवारी पासून येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये मुंबई व उपनगर मध्ये तापमानामध्ये 2-4 डिग्री सेल्सिअसने घट होऊ शकेल. तसेच, कच मधील काही भागात थंडीची लाट येऊ शकेल असेही हवामान विभागाने ट्विट करून म्हटले आहे.

डिसेंबर मध्ये थंडीने नीचांकी पारा दाखवला असताना जानेवारी मध्ये पावसाच्या सरी कोसळून सर्वांना या वेळी हवामानाचा अनुभव चांगलाच गोंधळात टाकणारा होता. तरीही हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे या आठवड्यात हवामान कोरडे असून काही ठिकाणी थंडी पूर्ववत होत असल्याने परत हिवाळ्याचा अनुभव लोकांना मिळत आहे.

हवामानात होणारे वेळोवेळी बदल लक्षात घेता इतर ऋतू मध्येही वेगवेगळे ऋतू अनुभवायला मिळत असताना वातावरणाचा अंदाज येण्यासाठी हवामान विभागाची भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे. येणार्‍या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.