#PM Kisan : ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात नाही येणार पंतप्रधान किसान योजनेचे पैसे, पटापट चेक करा ‘ही’ लिस्ट

Crop Loan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने लवकरच प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत या योजनेचा आठवा हप्ता बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतील, अशी अपेक्षा आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे 3 हप्त्यात दिले जातात. या महिन्याच्या अखेरीस 20 ते 25 तारखे दरम्यान सर्व शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा हप्ता हस्तांतरित केला जाईल, परंतु असे बरेच शेतकरी आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. याचा लाभ कोणाला मिळणार नाही हे जाणून घेऊया.

या लोकांना मिळणार नाही योजनेचा लाभ

1)नियमानुसार या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकर्‍याच्या नावे शेती असणे आवश्यक आहे.
2) यासह जमीन जर आजोबा किंवा शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावावर असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही.
3)या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍याच्या नावे शेतीची जमीन असणे आवश्यक आहे.
4)जर कोणी आयकर विवरण भरत असेल तर ते पंतप्रधान किसान सन्मान निधीमधून वगळले जातील.
5)यामध्ये वकील, डॉक्टर, सीए इत्यादीही या योजनेच्या नाहीत.

ऑनलाइन यादीमध्ये नाव कसे तपासाल

1)यादीमध्ये आपले नाव तपासण्यासाठी आपण प्रथम अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर भेट दिली पाहिजे.
2)त्यानंतर तुम्हाला होम पेजवर फार्मर कॉर्नर वर क्लिक करावे लागेल.
3)यामध्ये तुम्हाला लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4)लाभार्थी यादीवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल.

5)यावर आपण आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव माहिती प्रविष्ट कराल.

6) यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा.

7)संपूर्ण यादी आपल्या समोर येईल.

या व्यतिरिक्त, अधिक माहितीसाठी आपण या क्रमांकावर कॉल देखील करू शकता
— पंतप्रधान किसान सन्मान योजना लँडलाईन क्रमांक: 011—23381092, 23382401

— पंतप्रधान किसान सन्मान योजना टोल फ्री क्रमांक: 18001155266

–पंतप्रधान किसान योजना हेल्पलाईन क्रमांक: 155261, 0120-6025109

हे पण वाचा –

गावाकऱ्यांनो ‘ही’ योजना तुम्हाला माहिती आहे का? सरकार देणार 3.75 लाख रुपये; गावात राहून व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

तुमच्या डिजिटल सातबारा उताऱ्यावरील ‘ही’ चूक पडेल महागात; कर्जाची मर्यादा होइल कमी

पाळीव प्राणी, जनावरांना कोरोनाचा धोका किती? जाणुन घ्या पशुधन अधिकार्‍यांचे मत