राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता

Unseasonal Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :  येत्या पाच ते सहा दिवस राज्याच्या दक्षिण भागात वादळ, गारपीटसह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा ते तामिळनाडूची दक्षिण किनारपट्टी, कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीमा दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून 200 मीटर उंचीवर आहे. तसंच झारखंडच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा असून मध्य प्रदेश आग्नेय भाग उत्तर छत्तीसगड दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. मध्यप्रदेशच्या परिसरातही चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर भारतातील राजस्थानच्या अग्रणी या भागातही चक्रीय वाऱ्याची परिस्थिती आहे. लडाख व परिसरातही चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती आहे. उत्तर प्रदेशच्या आग्नेय भाग व परिसरातही चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे त्यामुळे राज्यातील अनेक भागात सकाळपासूनच उन्हाचा चटका वाढला असून कमाल तापमानातही वाढ होत आहे. सध्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी वाढ झाली आहे.

या जिल्ह्यात अवकाळीची शक्यता

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, आणि संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर आणि गडचिरोली. या जिल्ह्यांमध्ये आज (मंगळवारी २७ एप्रिल) अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाग व परिसरातही चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात सकाळपासूनच उन्हाचा चटका वाढला असून कमाल तापमानातही वाढ होत आहे. सध्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी वाढ झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि संपूर्ण मराठवाडा चंद्रपूर आणि गडचिरोली. या जिल्ह्यांमध्ये बुधवारी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.