७ मे पर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीचा हवामान खात्याचा अंदाज

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.राज्यात ४ मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ५ मे रोजी राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून ६ व ७ मे रोजी संपूर्ण राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर चक्रीय चक्रावात आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक व लगतच्या भागाकडे सरकला आहे त्यामुळेच राज्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान सातत्याने होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र ,मराठवाडा व विदर्भातील कमाल व किमान तापमानात घट झाली असल्याचे दिसून आला आहे. राज्यात सोमवारी सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे 41.2 अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर इतर 16.5 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. राज्यात होत असलेल्या पावसामुळे विदर्भाच्या बऱ्याच भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली आहे.

दरम्यान मागील 24 तासात राज्यात बुलढाणा 30, चंद्रपूर १२, महाबळेश्वर २०, पुणे 27 पाशान 22.5 पणजी 11, गोवा व परभणी 6 जालना 3 औरंगाबाद 1.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महाबळेश्वर, औरंगाबाद ,नागपूर, गोंदिया, पुणे, येथे हलका पाऊस झाला.