मराठवाडा विदर्भात पाऊस वाढण्याची शक्यता, गुरुवारी ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेली चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा वातावरण काहीसे निवळले असले तरी दुपारनंतर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होत आहे. तर दिवसभर उन्हाचा चटका वाढून झळा तीव्र होत आहेत. मागील दोन ते तीन दिवस पावसामुळे कमाल तापमान किंचित घटले आहे. कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. उद्यापासून पुन्हा तुरळक ठिकाणी वादळ विजांचा कडकडाट व गारपीट असा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे.

मंगळवारी मागे खानदेशातील जळगाव येथे सर्वाधिक ४१. २ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वर इथं 16.5 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे.सध्या दक्षिण केरळ आणि उत्तर कर्नाटक व परिसर दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे. तसाच पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसर ते आसाम पश्चिम उत्तर प्रदेश बिहार आणि हिमालय पश्चिम बंगाल पर्यंत चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर आहेत. उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील वातावरनात चांगलेच बदल होणार आहेत. कमाल आणि किमान तापमानात देखील चढ-उतार होणार आहेत.

दरम्यान , गुरुवारी सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड ,लातूर ,उस्मानाबाद, अकोला, संपूर्ण विदर्भ या भागात पूर्व मोसमी पावसाची दाट शक्यता आहे.