झिनिया फूलशेती! एक चांगला उत्पन्न देणारा फूलशेती पर्याय

zinnia flower
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । झिनियाचे फुल म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येतात ती रंगबिरंगी नाजूक फुले. झिनीयाचे फुल हे खुप आकर्षक असते. विविध रंगातील टपोरे झिनिया हे अनेकांचे आवडते फुल असते. हे नेहमी आपल्याला घरासमोर कुंडीत, बगिचेमध्ये दिसत असते पण या फुलांची लागवड ही फार कमी प्रमाणात व्यापारी तत्वावर केली जाते. पण आपण कधी विचार केला आहे का की, या फुलांची लागवड कुठे आणि कशी होते ते? चला तर मग जाणून घेऊया झिनीया लागवडीबद्दल.

मेक्सिको हे या फुलाचे उगमस्थान जरी असले तरी, त्याची लागवड भारतात फार वर्षपासून सूरु झाली आहे. मेक्सिकोमधून मग ह्या फुलाचा प्रसार हा अमेरिका आणि इतर देशांमध्ये झाला. या फुलाच्या लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामान लागते. खूप जास्त थंडी ह्या झाडाला मानवत नाही. या फुलांसाठी जमीन ही मध्यम काळी ते भारी काळी जमीन लागते. पण मुरमाड जमिनीत जर चांगल्या प्रकारे शेणखत वगैरे टाकले तर तेथेही याचे उत्पादन येऊ शकते.

झिनिया फुलाच्या उन्नत जाती:

1) झिनिया लिनीओरिसा(बटन झिनिया)
2)झिनिया इलेगनस(गेंदा झिनिया)
3)झिनिया हजेना(बुटका झिनिया)

झिनियची लागवड ही मुख्यतः जुलै- ऑगस्ट महिन्यामध्ये केली जाते. हे लागवड करताना दोन रोपांमधील व दोन ओळींमधील अंतर हे 45 बाय 45 सेंटीमीटर असे असावे. गादीवाफ्यावरील रोपांची वाढ १५ सेंटीमिटर किंवा जास्त झाली असली तर लागवडीच्या वेळी रोपांचे शेंडे खुडून रोपे लावावीत. यामुळे फुलांचा बहर चांगला येतो. या फुलांच्या झाडाच्या लागवडीसाठी जवळच्या कृषी केंद्रावर रोपे उपलब्ध होऊ शकतील. यामुळे फुलांची शेती करत असाल तर हा एक चांगला पर्याय होऊ शकतो.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/GkHDokKFuPu1dQERW7Urj7