यंदाची अक्षयतृतीया शेतकऱ्यांसाठी गोड ! खात्यात पाठवले जाणार 19000 कोटी

State Budget 2021
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्ही जर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. येत्या 14 मे रोजी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी मोदी सरकार पी एम किसान योजनेचा आठवा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाठवणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः केंद्रीय कृषिमंत्र्यांनी ट्विट करत दिली आहेत.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विट केलं आहे की, ‘पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 14 मे 2019 रोजी सकाळी पी एम किसान योजनेअंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याच्या स्वरूपात 19 हजार कोटींची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून हस्तांतरित करता येईल. याची लिंक (https://pmevents.ncog.gov.in)देखील तोमर यांनी ट्विट शेअर केली आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत.

देशातील संपूर्ण शेतकऱ्यांची नजर असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता थेट खात्यामध्ये जमा केला जातो. पी एम किसान योजनेचा 7 वा हप्ता 25 डिसेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आला. आता आठवा हप्ता 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करणार आहेत

ऑनलाइन यादीमध्ये नाव कसे तपासाल

1)यादीमध्ये आपले नाव तपासण्यासाठी आपण प्रथम अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर भेट दिली पाहिजे.
2)त्यानंतर तुम्हाला होम पेजवर फार्मर कॉर्नर वर क्लिक करावे लागेल.
3)यामध्ये तुम्हाला लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4)लाभार्थी यादीवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल.
5)यावर आपण आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव माहिती प्रविष्ट कराल.
6) यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा.
7)संपूर्ण यादी आपल्या समोर येईल.

या व्यतिरिक्त, अधिक माहितीसाठी आपण या क्रमांकावर कॉल देखील करू शकता

— पंतप्रधान किसान सन्मान योजना लँडलाईन क्रमांक: 011—23381092, 23382401

— पंतप्रधान किसान सन्मान योजना टोल फ्री क्रमांक: 18001155266

–पंतप्रधान किसान योजना हेल्पलाईन क्रमांक: 155261, 0120-6025109