Jambhul Powder Business : जांभूळ फळापासून सुरु करा, ‘हा’ भन्नाट बिझनेस; होईल बक्कळ कमाई!

Jambhul Powder Business Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जांभूळ शेती (Jambhul Powder Business) केली जाते. प्रामुख्याने राज्यातील ठाणे, पालघर आणि कोकण पट्ट्यात शेतकरी वर्षानुवर्षे जांभळाचे पीक घेत आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला जांभूळ या पिकापासून करता येणाऱ्या एका छोटेखानी व्यवसायाबद्दल माहिती सांगणार आहोत. प्रामुख्याने शेतकरी आपल्या भागात अतिवृष्टी किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीला आलेला जांभूळ खराब झाल्यास तसाच सोडून देतात. मात्र, तुम्ही अशावेळी त्या टाकाऊ आणि खराब झालेल्या जांभळांच्या बियांपासून पावडर (Jambhul Powder Business) तयार करून, त्याची विक्री करू शकतात. याशिवाय अशा आपत्तीच्या वेळी तुमच्या परिसरातील शेतकऱ्यांकडून देखील तुम्ही असा खराब झालेला जांभूळ खरेदी करू शकतात.

जांभळाचे महत्वाचे गुणधर्म (Jambhul Powder Business Plan)

जांभूळ हे गोड आणि काहीसे आंबट फळ असून, ते प्रथिने आणि खनिजांचा मुख्य स्रोत आहे. जांभळाचे अनेक आयुर्वेदिक फायदे असून, ते हृद्य रोगासाठी महत्तवपूर्ण मानण्यात आले आहे. तर दररोजच्या चहामध्ये सुद्धा डॉक्टर जांभूळ पावडरीचा (Jambhul Powder Business) वापर करण्याचा सल्ला देतात. इतकेच नाही तर ऍसिडिटी, गॅस, अपचन या पोटाच्या समस्यांसोबतच हृदयरोग आणि किडनीच्या समस्या असलेल्या पेशंटना दूध आणि जांभळाच्या पानांचा चहा पिण्यास सांगितले जाते. याशिवाय मूत्रसंसर्ग आणि रोगांमध्ये जांभूळ बियांचा पावडरचा चहा पिण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात.

विविध कंपन्यांकडून चुर्णामध्ये वापर

उन्हाळाच्या दिवसांमध्ये जांभळांचा सिझन असतो. ज्यामुळे तुम्हाला त्याच्या बिया कडक उन्हात वाळवून, पावडर बनवण्यासही अधिकचा खर्च येणार नाही. जांभळाच्या ‘बी’ मध्ये मोठया प्रमाणात पोषकतत्वे असतात. ज्यामुळे त्याच्या पावडरचा उपयोग हा मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी गुणकारी मानण्यात आला आहे. याशिवाय या पावडरीमुळे पचनसंस्था आणि चयापचय प्रक्रिया चांगली राहते. ज्यामुळे विविध कंपन्यांकडून तयार केल्या चूर्णामध्ये त्याचा विशेषत्वाने वापर केला जातो. त्यामुळे तुम्ही अशा कंपन्यांसोबत बोलून तुमची जांभूळ बियांची पावडर त्यांना विक्री देखील करू शकतात.

मागणीत दिवसेंदिवस वाढ

जांभूळ पावडरचा (Jambhul Powder Business) वापर प्रामुख्याने मधुमेहाच्या रोग्यांमध्ये इन्सुलिनचे प्रमाण वाढवण्यासाठी केला जातो. याशिवाय जांभूळ पावडरचा ग्लाइसेमिक इंडेक्स देखील खूपच कमी असतो. ज्यामुळे जांभूळ पावडरच्या नियमित सेवनाने मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी जांभूळ बियांची पावडर अत्यंत गुणकारी मानली जाते. परिणामी, अनेक ठिकाणी जांभळाच्या बियांच्या पावडरचा वापर होत असल्याने त्याची बाजारातील मागणी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तुम्ही अशा परिस्थितीत या जांभुळ बियांच्या पावडरच्या व्यवसायात उतरून मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतात.