हॅलो कृषी | केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि देशांतर्गत शेतीचा विकास व्हावा यासाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या असून या योजनेमध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजना ही एक महत्त्वाची योजना आहे या योजनेमधून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष काळजी घेतली जाते यासोबतच आर्थिक मदतही शेतकऱ्यांना केली जाते या योजनेबद्दल बरेच समस्या शेतकऱ्यांमध्ये आहेत तर जाणून घेऊ या योजने बद्दल संपूर्ण माहिती
शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये सिंचनासाठी नवनवीन उपकरणे उपलब्ध करून देणे आणि नवीन तंत्रज्ञानासाठी मार्गदर्शन करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत देशांमधील प्रत्येक जिल्ह्यात सिंचनाकरिता पाणी देणे तसेच आणि उपलब्ध नसेल तर नवीन जलस्रोत तयार करणे भूजल विकास करणे इत्यादी कामे केली जातात जेणेकरून योग्य वेळी सिंचन होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढत जाईल.
ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची शेती आणि पाण्याचे स्रोत आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेमधून लाभ देण्यात येत आहे यासोबतच कंत्राटी शेती करणाऱ्या सहकारी आणि बचत गटांना ही या योजनेमधून लाभ दिला जातो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी केल्यास आधार कार्ड जोडून या योजनेसाठी अर्ज करता येईल यानंतर सिंचन उपकरणावर 80 ते 90 टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते त्यामुळे सोप्या पद्धतीने सिंचन होऊन लवकरात लवकर जमीन ओलिताखाली आल्याने शेतकऱ्यांचे पीक चांगल्या प्रकारे होऊ शकते.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/GkHDokKFuPu1dQERW7Urj7