हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये कोंबड्यांच्या ‘बर्ड फ्लू’ (Nagpur Bird Flu) या धोकादायक आजाराने प्रवेश केला आहे. त्यामुळे आता राज्यासह नागपूरच्या आसपासच्या छत्तीसगड, कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील पोल्ट्री उत्पादकांसाठी ही मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे. पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळांमध्ये दगावलेल्या कोंबड्यांचे नमुने तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता नागपूर जिल्हा प्रशासनाकडून पुढील 21 दिवस कोंबड्यांच्या खरेदी आणि वाहतुकीस पूर्णतः बंदी (Nagpur Bird Flu) घालण्यात आली आहे.
आतापर्यंत 8500 कोंबड्या नष्ट (Nagpur Bird Flu Chicken)
केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार, जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ रॅपिड ऍक्शन पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण 8 हजार 501 कोंबड्या, 16 हजार 774 अंडी तसेच 5 हजार 400 किलो कोंबड्यांचे खाद्य नष्ट करण्यात आले आहे. याशिवाय कोंबड्यांच्या वाहतूक व खरेदी-विक्रीस पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. प्रामुख्याने नागपूर शहरातील कोंबड्या अन्य ठिकाणी वाहतूक होऊन, ‘बर्ड फ्लू’ (Nagpur Bird Flu) हा कोंबड्यांचा साथीचा आणखी पसरू नये. म्हणून हे खबरदारीचे उपाय करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. नागपूर येथील राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात मागील तीन ते चार दिवसांपासून दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. त्यानंतर पुणे आणि भोपाळ येथील अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये मृत्यू झालेल्या कोंबड्यांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.
पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर
दरम्यान, आता ‘बर्ड फ्लू’चे निदान झाल्यानंतर नागपूर जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर असल्याचे सांगितले जात आहे. अशातच नागपूर येथील केंद्र वगळता अन्य कोणत्याही ठिकाणी ‘बर्ड फ्लू’चे निदान झालेले नसून, त्यामुळे नागरिकांनी आणि पोल्ट्री उत्पादकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. सध्याच्या घडीला नागपूरच्या प्रादेशिक अंडी उबगणी केंद्रातील 8500 पक्षी आणि शेजारीच एक किलोमीटरवर असलेल्या नागपूरच्या पशूवैद्यकीय विद्यापीठाच्या कुकुटपालन केंद्रातील 260 कोंबड्यांना मारण्यात आले आहे. याव्यक्तिरिक्त अजून कुठेही निदान झाले नसून, नागरिकांसह पोल्ट्री उत्पादकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन नागपूरच्या जिल्हा आपत्ती निवारण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.