Swaraj Tractors : स्वराज ट्रॅक्टर्स कंपनीची 50 वर्ष पूर्ण; लाखो शेतकऱ्यांच्या हृदयावर करतीये राज्य!

Swaraj Tractors Completes 50 Years
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील प्रत्येक शेतकऱ्याला आज ‘स्वराज’ या आघाडीच्या ट्रॅक्टर (Swaraj Tractors) निर्माता कंपनीबद्दल माहिती असून, कंपनीने शेतकऱ्यांच्या सेवेत आपली 50 वर्ष पूर्ण केली आहे. महिंद्रा समूहाची एक शाखा म्हणून स्वराज ट्रॅक्टर निर्माता कंपनी 1974 मध्ये स्थापित झाली होती. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासांठी उभारलेली कंपनी म्हणून ती उभी राहिली होती. मात्र, कंपनीने मागील 50 वर्षांपासून अत्याधुनिक ट्रॅक्टरची निर्मिती करत शेतकऱ्यांच्या हृदयावर राज्य करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपली 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्वराज ट्रॅक्टर्सने (Swaraj Tractors) ‘राष्ट्रीय वन कॅम्पेन’ सुरु केले आहे. ज्यास ‘जोश का स्वर्ण उत्सव’ असे नाव देण्यात आले आहे.

‘हा’ तर शेतकऱ्यांचा सन्मान (Swaraj Tractors Completes 50 Years)

पंजाबमधील मोहाली येथील आपल्या सर्वात पहिल्या ट्रॅक्टर निर्माता प्लांटपासून कंपनीने आपल्या ‘जोश का स्वर्ण उत्सव’ या अभियानाची सुरुवात केली आहे. यावेळी स्वराज ट्रॅक्टर (Swaraj Tractors) निर्माता कंपनीचे अध्यक्ष हेमंत सिक्का यांनी म्हटले आहे. या कॅम्पेनच्या निमित्ताने आपण एखाद्या महत्वाच्या यात्रेला निघालो आहे. अगदी त्याच पद्धतीने एक कुटुंब म्हणून देशातील शेतकऱ्यांच्या कंपनीच्या वृध्दीमधील योगदानाबद्दल, शेतकऱ्यांचा सन्मान करतो. त्यामुळे सध्या कंपनीकडून सुरु करण्यात आलेले हे ‘राष्ट्रीय वन कॅम्पेन’ कंपनीच्या 50 वर्ष पूर्ण करण्याच्या निमित्त्ताने, देशातील शेतकऱ्यांची सेवा आणि त्यांना सशक्त बनवण्यासाठी महत्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या भेटी गाठी घेणार

स्वराज कंपनीने आपले हे कॅम्पेन कंपनीच्या उत्कृष्ट कार्याची शेतकऱ्यांना ओळख करून देण्यासाठी सुरु केले आहे. कंपनीकडून 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात देशभरात हे अभियान चालवले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून कंपनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. याशिवाय कंपनीकडून आपल्या नवीन रेंजच्या ट्रॅक्टरबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून ट्रॅक्टर रॅली, शेतकऱ्यांशी भेटी गाठी, कंपनीच्या स्थानिक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी कंपनीला संधी मिळणार असल्याचेही स्वराज कंपनीचे अध्यक्ष हेमंत सिक्का यांनी म्हटले आहे.