हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीमध्ये यंत्राचा (Solis Tractor) मोठ्या प्रमाणावर वापर होतो. शेतीतील यांत्रिकीकरणाचा विचार केला तर ट्रॅक्टरचा वापर सर्वात जास्त केला जातो. त्यामुळे शेती आणि ट्रॅक्टर यांच्याशी घनिष्ठ नाते तयार झाले आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे ट्रॅक्टर सध्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. प्रत्येक ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. यात शेतकऱ्यांची गरज ओळखून तयार केले गेलेले सोलीस यानमार ब्रँडचे वायएम 3 सिरीजमधील ट्रॅक्टर (Solis Tractor) खूपच फायदेशीर आहेत. आज आपण या ट्रॅक्टरबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
काय आहेत सोलीस यानमार ब्रँडची वैशिष्ट्ये? (Solis Tractor For Farmers)
यामाहाच्या एकशे दहा वर्ष जुन्या डिझेल इंजिनवर कार्यक्षमतेने वायएम 3 सिरीज (Solis Tractor) तयार करण्यात आलेली आहे. जी पूर्णपणे भारतीय शेतकऱ्यांची शेतीतील गरज ओळखून व ती पूर्ण करता यावी. यासाठी वायएम 3 सिरीजचे ट्रॅक्टर विशेष पद्धतीने डिझाईन केलेले असून, भारतीय शेतीसाठी उपयुक्त पद्धतीने तयार करण्यात आले आहे. या सीरिजच्या या ट्रॅक्टरमध्ये जागतिक दर्जाचे इंजिन, फुल सिंनक्रोमेश, गिअर तसेच पुश बटनवर चालणारे पीटीओ यासारखे संपूर्ण वैशिष्ट्ये देण्यात आले आहे.
अनेक देशांमध्ये उमटवलाय ठसा
याशिवाय शेतकऱ्यांच्या तसेच शेतीच्या विशेष कामाची आवश्यकता पूर्ण व्हावी, यासाठी या सीरिजचे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. जेव्हा ही सीरिज भारतामध्ये लॉन्च झाली त्या अगोदर ती थायलंड, आग्नेय आशियाई देश, युरोप आणि ब्राझील तसेच युएस बाजारपेठेमध्ये निर्यात करून, तिने त्या ठिकाणी आपला ठसा उमटवला आहे.
जपानी इंजिन तंत्रज्ञानाने विकसित
सोलीस यानमार वायएम 3 सीरिजमध्ये शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अग्रोनोमीकली डिझाईन केलेल्या चार वे ऍडजेस्टेबल सीट आणि पावर स्टेरिंगसह हिरो डायनामिक होर्नेट डिझाईन आहे. या ट्रॅक्टरमध्ये प्रसिद्ध जपानी इंजिन तंत्रज्ञान करण्यात आली असून, जास्तीत जास्त काम साध्य करण्यासाठी तयार केले गेले आहे. ट्रॅक्टर पॉवर हाउस हे मोनो प्लांटर एफआयपी आणि फेदर टच 8F+8R शटल शिफ्ट ट्रान्समिशन सहज चार सिलेंडर इंजिन आहे. चांगल्या कार्यक्षमतेसाठी आवाज आणि कंपन दूर व्हावे यासाठी बॅलेन्सर शाफ्टसह एकत्र केले आहे.