Abortion in Animal: ‘या’ आजारामुळे होऊ शकतो जनावरात अचानक गर्भपात! जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन जनावरातील गर्भपात (Abortion in Animal) हा गाभण कालावधीत वेगवेगळ्या कारणामुळे कोणत्याही वेळी होऊ शकतो. काही वेळा निरोगी गाभण जनावरामध्ये (Pregnant Animals) अचानक गर्भपात (Abortion) झाल्याचे दिसून येते.

गर्भपाताची कोणतीही लक्षणे (Abortion Symptoms In Animals) दिसत नाहीत तरी होणारा हा गर्भपात लेप्टोस्पायरोसिस (Leptospyrosis) या आजारामुळे होतो. गाभण जनावरांमध्ये चौथ्या महिन्याच्या पुढील आणि गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या जनावरांमध्ये गर्भपाताची (Abortion in Animal) समस्या दिसून येते.

आजाराचा प्रसार

लेप्टोस्पायरोसिस हा जीवाणूजन्य आजार (Bacterial Disease) असून 150 हून अधिक प्राण्यांच्या प्रजातीमध्ये हा रोग दिसून येतो.

जास्त दूध देणार्‍या जनावरांमध्ये (Milking Animals) लेप्टोस्पायरोसिस आजाराचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी, चारा यावर आजारी जनावरांचे मूत्र, गर्भाशयाचा स्त्राव पडल्याने होत असतो.

बाधित जनावरांचे मूत्र (Animal Urine) हे प्रसारास प्रमुख कारणीभूत घटक असते. एखाद्या जनावराला या रोगाची बाधा झाल्यास आजारपणानंतर जवळपास 40 दिवस या रोगाचे जंतु मुत्रा वाटे बाहेर पडत असतात.

हा आजार सर्व पाळीव प्राणी, तसेच जनावरांपासून माणसांमध्येही याचा संसर्ग होत असतो. अति पावसाच्या, पाणथळ भागात जेथे पाणी साठून राहते तसेच ज्या ठिकाणी हवेत आर्द्रतेचे जास्त प्रमाण आहे अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो.

या आजाराचे जीवाणू उंदराच्या शरीरात सुप्त अवस्थेत असतात. त्यांच्या मलमूत्राद्वारे झपाट्याने या आजाराचा प्रसार होत असतो. 

आजाराची लक्षणे

या आजाराचा प्रादुर्भाव तत्काळ तीव्र, तत्काळ सौम्य आणि दीर्घकालीन तीव्र या तीन टप्प्यात दिसून येतो. एक महिन्यापर्यंतची वासरे या रोगाला पटकन बळी पडतात.

गाभण जनावरांमध्ये चौथ्या महिन्याच्या पुढील आणि गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या जनावरांमध्ये गर्भपाताची (Abortion in Animal) समस्या दिसून येते.

कोणतीही लक्षणे नसताना अचानकपणे जनावरांचा गर्भपात (Abortion in Animal) होणे हे या आजाराचे मुख्य लक्षण आहे. या आजाराचे निदान जनावरांच्या लघवीमधील रोगजंतूचा प्रादुर्भाव तपासून करता येते.

प्रतिबंधात्मक उपाय

घूस, उंदीर यांची संख्या कमी करण्यासाठी गोठ्यात तसेच आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. शरीरावर जखम असल्यास त्वरित उपचार करावेत. लक्षणांनुसार प्रभावी प्रतिजैविके पशु वैद्यकांच्या सल्ल्याने द्यावीत.