Bulls Market Price : खरिपाच्या तोंडावर बैलजोडीच्या किमतीत मोठी वाढ; पहा… काय आहे भाव!

Bulls Market Price In Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळाभर चारा नसल्याने अनेक शेतकरी हंगाम संपताच (Bulls Market Price) बैल आणि जनावरे विक्री करत असतात. तर ऐन पावसाळयाच्या तोंडावर पुन्हा नवीन जोड खरेदी करत असतात. मात्र, मे आणि जून महिन्यात दरवर्षी बैलांना खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असते. ज्यामुळे या कालावधीत बैलांच्या किमती या गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहे. सध्या देखील बैल बाजारात सामान्य शेतकऱ्यांचे तोंड पुरत नसल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. कारण गेल्या हंगामात अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. याउलट चालू हंगामाच्या भांडवलासह बैलांच्या खरेदीसाठी (Bulls Market Price) शेतकरी हतबल असल्याचे पाहायला मिळत आहे.

किमतीत 25 ते 30 टक्क्यांनी वाढ (Bulls Market Price In Maharashtra)

सध्याच्या घडीला शेती मशागतीला लागणाऱ्या जनावरांना मागणीत वाढ (Bulls Market Price) झाल्याने, राज्यात ठिकठिकाणी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात बैलांच्या किमती सुमारे 25 ते 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. शेती कामातील मुख्य नांगरटीचे कामे झाल्यावर किमती कमी होतात, असा साधारण बाजारातील कल असतो. मात्र, यावर्षी बैल बाजारात उलटे चित्र पाहायला मिळत आहे. पुढील महिन्यात शेतीची कामे पाळी, पेरणी, मोघडणी ही कामे बैल चांगल्या पद्धतीने करतात. विशेष म्हणजे ओलीवर पेरण्यासाठी ट्रॅक्टरपेक्षा बैल पेरणीच उत्तम असल्याचे अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. ज्यामुळे सध्या बैलांच्या मागणीत वाढ झाली आहे.

बैलजोडी खरेदीकडे शेतकऱ्यांना कल

शेतीची कोने-कोपरे बैलांच्या साहाय्याने मोकळी करता येतात. जास्त रान लागवडी योग्य होते. त्यामुळे ट्रॅक्टर पेक्षाही बैलांच्या कामाकडे शेतकरी वर्ग वळाल्याने मागणी वाढली असल्याचे बैल बाजारील एका खरेदीदार शेतकऱ्याने म्हटले आहे. मागील महिन्यात 60 हजार रुपयांना विकल्या गेलेल्या बैलजोडीची किंमत आजच्या बाजारात 80000 पर्यंत गेली आहे. असेही या शेतकऱ्याने म्हटले आहे.

40 हजारांपासून सव्वा लाखापर्यंत किमती

दरम्यान, सध्या राज्यातील बैल बाजारामध्ये एका बैल जोडीची किंमत 40 हजारांपासून सव्वा लाख रुपयापर्यंत आहे. आवक कमी व ग्राहक जास्त झाल्याने बाजार भाव वाढले आहेत. शेतात मशागतीची कामे संपल्यावर बैलांचे बाजारभाव खाली येतील, असा दरवर्षीचाच रोख असतो. असे अन्य एका शेतकऱ्याने म्हटले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि अन्य बाबींसह बैल जोडीसाठी देखील अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याचे दिसून येत आहे.