Turmeric Variety: परराज्यातही आहे हळदीच्या ‘या’ वाणाची क्रेझ; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत (Turmeric Variety) कृषी तंत्र विद्यालय, कसबे डिग्रस येथे उत्पादित करण्यात आलेल्या गुणवत्तापूर्ण हळद बियाण्यास केवळ महाराष्ट्रातच नाही, तर इतर परराज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रस येथील हळद संशोधन केंद्रात उत्पादित करण्यात आलेल्या ‘फुले स्वरुपा’ (Phule Swarupa) या गुणवत्तापूर्ण हळद बियाण्याची (Turmeric Variety) भुरळ छत्तिसगडला देखील पडली आहे.

छत्तिसगड (Chhattisgarh) राज्यातील अंबिकापुर येथील मॉ आदिशक्ती बीज उत्पादक कंपनीने हळद संशोधन केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांच्याकडे खोडकिड मुक्त निरोगी बियाणे मिळत नसल्याचे सांगत त्यांनी 51 क्विंटल हळदीचे बियाणे खरेदी केले. 

महाराष्ट्रातील सांगली (Sangali) जिल्हा हा ब्रिटिश कालखंडापासून गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी (Turmeric Cultivation) प्रसिद्ध आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (MPKV, Rahuri) कुलगुरू कर्नल डॉ. प्रशांत कुमार पाटील यांच्या प्रेरणेने विद्यापीठात आमुलाग्र बदल होत आहेत. कसबे डिग्रस येथील हळद संशोधन केंद्राने (Turmeric Research Center) संशोधित केलेले ‘फुले स्वरुपा’ हे वाण महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यात सुद्धा प्रसिद्ध आहे (Turmeric Variety) .

कृषी तंत्र विद्यालय, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे प्राचार्य डॉ. मनोज माळी यांनी एक हेक्टर क्षेत्रावर सेलम (Selam Turmeric) आणि फुले स्वरूपा या हळद वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम (Turmeric Seed Program) राबवण्यात आला होता. मे 2023 मध्ये लागवड करून उरलेली सर्व कामे खुरपणी, तण नियंत्रण,कीड व रोग प्रतिबंधक उपाय योजना, भरणी खते देणे, ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब इत्यादी सर्व कामे विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या आवडीने आणि अनुभव आधारित शिक्षण घेण्याच्या दृष्टीने केलेली आहेत. ‌वार्षिक परीक्षा सुरू असताना देखील स्वत:हून एक ते दीड तास हळद काढणी, बेणे निवडणे, भेसळ ओळखणे, बेणे साठवणे, मातृकंद, बगलगड्डे, सोरा गड्डे, हळकुंडे इत्यादी सर्व कौशल्यपूर्वक कामे विद्यार्थ्यांनी केलेली आहेत.

हळदीचे निरोगी बियाणे  (Turmeric Variety)      

हळदीचे निरोगी बियाणे (Turmeric Rhizome) छत्तीसगड राज्यातील मॉ आदिशक्ती बीज उत्पादक कंपनी, अंबिकापुर, छत्तीसगड येथील संचालकांना पसंत पडले. त्यांनी कृषी तंत्र विद्यालय आणि हळद संशोधन केंद्राचे एकूण 51 क्विंटल बियाणे खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे आणि कष्टाचे कौतुक करत प्रेरणा दिली. कृषी तंत्र विद्यालयाने हळदीचे उत्पादन क्षेत्र वाढवावे, निरोगी निर्यातक्षम बियाणे निर्मितीवर भर द्यावा आणि शेतकरी सेवेत कमी पडू नये अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आणि विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कार्य पाहून समाधान व्यक्त केले.

फुले स्वरूपा जातीची वैशिष्ट्ये (Turmeric Variety)

  • ही जात मध्यम उंच वाढणारी असून या जातीच्या पक्वतेचा काळ हा 255 दिवसांचा आहे. या जातीच्या फुटव्यांची संख्या दोन ते तीन प्रति झाड असते.
  • या जातीचे गड्डे मध्यम आकाराचे असून, वजनाने 50 ते 55 ग्रॅम पर्यंत असतात. हळकुंडे वजनाने 35 ते 40 ग्रॅम असून, प्रत्येक कंदात सात-आठ हळकुंडे असतात. त्यानंतर त्यावर उप-हळकुंडांची वाढ होत असते.
  • या जातीमध्ये कुरकुमीनचे (Turmeric Curcumin) प्रमाण जास्त (5.19 टक्के इतके) असून, उतारा 22 टक्के इतका मिळतो.
  • या जातीचे ओल्या हळदीचे सरासरी हेक्‍टरी उत्पादन हेक्‍टरी 358.30 क्विंटल प्रति हेक्टर व वाळलेल्या हळदीचे उत्पादन 78.82 क्विंटल प्रति हेक्‍टर मिळते.
  • ही जात पानावरील करपा रोग (Anthracnose), तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक आहे.