हॅलो कृषी ऑनलाईन: भाजीपाला (Brussels Sprout) लागवड आज शेतकर्यांसाठी खूप फायदेशीर आहे. कारण भाजीपाला लागवड करून शेतकरी कमी वेळात जास्त नफा मिळवू शकतात. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका उत्कृष्ट भाजीची माहिती घेऊन आलो आहोत, जी हुबेहुब कोबीसारखी दिसते. या भाजीचे नाव आहे ‘ब्रुसेल्स स्प्राऊट’ (Brussels Sprout). या कोबीला ‘बेबी कोबी’ (Baby Cabbage) असेही म्हणतात.
ब्रुसेल्स स्प्राऊटची वैशिष्ट्ये (Brussels Sprout)
ब्रुसेल्स स्प्राऊटचा गड्डा वाफवून भाजीसाठी किंवा कच्चा बारीक चिरून सॅलड (Salad) म्हणून सुद्धा खाण्यासाठी वापरतात. हा कोबीसारखाच दिसणारा पण छोट्या आकाराचा गड्डा असतो. गड्डा पानांच्या बेचक्यांत वाढतो. यास उत्तम स्वाद आणि चव असते.
या कोबीच्या जातीत (Brussels Sprout Nutrition) अॅन्टि-ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. सल्फोराफेन द्रव्य मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे नियंत्रण करते. यात कॅलरीजचे प्रमाण सुद्धा कमी असते. अ, के, बी- 63, फोलिक आम्ल आणि खनिजे, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम यांचे योग्य प्रमाण असते.
ब्रुसेल्स स्प्राऊटला कुठे आहे मागणी? (Demand Of Brussels Sprout)
जपान, ऑस्ट्रेलिया, युरोप, इटली, आणि अमेरिका यासारख्या देशात (Exotic vegetable) ब्रुसेल्स स्प्राऊटची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. अमेरिकेमध्ये ब्रुसेल्स स्प्राऊटचे अंदाजे 90 टक्के उत्पादन दर वर्षी डबाबंद प्रक्रियेसाठी वापरले जाते.
भारतात पंचतारांकित हॉटेल्समध्ये या भाजीला चांगली मागणी आहे. भारतात पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई यासारख्या भागात काही प्रमाणात या भाजीची लागवड केली जाते. बाजारातील इतर भाज्यांच्या तुलनेत या कोबीची किंमत खूपच जास्त आहे.
ब्रुसेल्स स्प्राउट्सच्या (Brussels Sprout Cultivation) उत्पादनाबाबत ICAR चा सल्ला
- हे एक कोबी भाजीपाला पीक आहे, त्याची लहान डोके वाढत्या देठासह बाहेर पडतात.
- हे पीक मध्यम आणि उंच पर्वतीय भागात उत्पादनासाठी योग्य आहे.
- त्याच्या प्रगत जातींमध्ये ‘हिल्स आयडियल’ (Hilds Ideal) आणि ‘रुबी’ (Ruby) यांचा समावेश होतो.
- शेणखत तयार केल्यानंतर शेणखत, सुपर फॉस्फेट व पोटॅशची संपूर्ण मात्रा आणि युरियाची एक तृतियांश मात्रा शेतात टाकावी व उर्वरित रक्कम एक महिन्यांनंतर शेतात टाकावी.
- या पिकासाठी प्रथम रोपवाटिका तयार केली जाते आणि त्याची 4 ते 5 आठवडे जुनी रोपे तयार शेतात लावली जातात.
- हलकी चिकणमाती, वालुकामय चिकणमाती आणि हलकी चिकणमाती जमिनीत शेतकरी त्याचे चांगले उत्पादन घेऊ शकतात.
- चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतकर्याने कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने 2 ते 3 वेळा नांगरणी करावी.