Animal Horns: जनावरांची शिंगे वेळीच कापा, नाहीतर होतो आजाराचा धोका!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: प्राण्यांची शिंगे (Animal Horns) त्यांच्यासाठी अनेक कार्ये करतात. प्राणी त्यांच्या शिंगांचा वापर लढण्यासाठी आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी करतात. पण बघितले तर त्यांच्या शिंगांचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. प्राण्यांची शिंगे कापण्याला शास्त्रज्ञांच्या भाषेत डी-हॉर्निंग (Dehorning) असेही म्हणतात. जनावरांचे शिंगे कापले नाही तर ते मनुष्यप्राण्यांसाठी जेवढे धोकादायक आहेत तेवढेच ते जनावरांसाठी सुद्धा हानिकारक आहे. चला तर मग या लेखात त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया, जनावरांची शिंगे (Animal Horns) का कापण्याची गरज आहे.

शिंगांमुळे जनावरांना धोकादायक आजार होतो (Animal Horn Disease)

  • मोठ्या आणि लांब शिंगे असलेल्या प्राण्यांना (Animal Horns) सर्वात धोकादायक आजार (Horn Disease) झाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. शिंगाच्या पेशी प्राण्यांमध्ये अनावश्यकपणे वाढतात, जे प्राण्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. वास्तविक, अशा परिस्थितीत शिंगे लवकर मऊ होऊ लागतात आणि नंतर हळूहळू एका बाजूला लटकू लागतात. त्यामुळे प्राण्यांच्या डोक्यात खूप वेदना होतात आणि ही वेदना कायम राहते. याचा परिणाम असा होतो की प्राण्याचे डोके एका बाजूला झुकते. काही दिवसांनी शिंग स्वतःच तुटून पडते. अशा स्थितीत जनावराच्या डोक्याच्या आतील बाजूस एक जखम राहते. यासोबतच प्राण्याच्या डोक्याचे मांसही हळूहळू कुजते. काही दिवसात या जखमेत जंत येऊ लागतात, जे कॅन्सरचे रूप घेतात. यावर वेळीच उपचार न मिळाल्यास जनावराचा मृत्यू निश्चित आहे.
  • प्राण्यांच्या शिंगांवर एक जाड थर असतो, त्याला कवच म्हणतात हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. शिंगाच्या आजूबाजूच्या भागात प्राण्यांच्या आपसी भांडणामुळे, खाज सुटणे आणि इतर अनेक आजारांमुळे किंवा शिंग कुठेतरी अडकल्यास हे कवच बंद होते.
  • अशा स्थितीत जनावराच्या डोक्यातून भरपूर रक्त बाहेर पडते, जे घरगुती उपायांनी अजिबात बरे होत नाही. अशा स्थितीत पशुपालक बांधवांनी आपल्या जनावरांना ताबडतोब जवळच्या डॉक्टरांकडे न्यावे.
  • अनेक प्राण्यांची शिंगे वाढून मागून वळतात आणि प्राण्यांच्या डोक्यात किंवा कानाजवळच्या जागेत शिरतात, असेही आढळून आले आहे. जे प्राण्यांसाठी धोकादायक आहेत

वरील सर्व परिस्थिती टाळण्यासाठी जनावरांची शिंगे (Animal Horns) वेळोवेळी कापली पाहिजेत. काही प्राण्यांची शिंगे कापणीनंतर खूप सुंदर दिसतात हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. काही पशुपालक त्यांच्या जनावरांना सुंदर आणि अद्वितीय दिसण्यासाठी शिंग कापण्याबरोबरच त्यांना रंगीबेरंगी रंगही देतात. त्यामुळे तुमचे जनावर सुंदर दिसावे आणि त्यांना लांब शिंगांमुळे हानी होऊ नये म्हणून वेळोवेळी ही शिंगे कापत राहा.  

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.