हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये सध्याच्या घडीला सर्व यंत्रापेक्षा ट्रॅक्टरला (Massey Ferguson) खूप महत्व वाढले आहे. कारण शेताची पूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंतची सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागली आहेत. ज्यामुळे सध्या बैलांनी होणारी शेती लुप्त झाली आहे. विशेष म्हणजे शेतीमध्ये ट्रॅक्टर व्यतिरिक्त जी काही यंत्रे आहेत. ती सर्व यंत्रे ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने चालवली जातात. ज्यामुळे ट्रॅक्टर हे शेतीसाठी खूप महत्त्वाचे यंत्र आहे. परिणामी, शेतकरी जेव्हा ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करतात तेव्हा त्याची क्षमता, परवडण्याजोगी किंमत आणि मेन्टेनन्स कमी इत्यादी गोष्टी पाहूनच खरेदी करतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण ‘मॅसी फर्ग्युसन 241 डीआय डायनाट्रॅक ट्रॅक्टर’बाबत (Massey Ferguson) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
मॅसी फर्ग्युसन 241 डीआय डायनाट्रॅक ट्रॅक्टर’ची वैशिष्ट्ये (Massey Ferguson Tractor)
मॅसी फर्ग्युसन 241 डीआय डायनाट्रॅक ट्रॅक्टर हा 42 एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर (Massey Ferguson) असून, यामध्ये तीन सिलेंडर आणि 2500 सीसीचे इंजिन आहे. जे शेतीतील अगदी कठीणातील कठीण कामासाठी खूप महत्त्वाचे आहे. तसेच या ट्रॅक्टरचा पीटीओ पॉवर ही 38 एचपी आहे. या ट्रॅक्टरचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाणी थंड करण्यासाठी वॉटर कोल्ड पद्धत आणि एअर फिल्टरसाठी वेट टाईप देण्यात आले असून, जे ट्रॅक्टरला सुरक्षित ठेवतात. त्यासोबतच या ट्रॅक्टरमध्ये ड्युअल क्लचसह आणि पुढील बाजूस बारा आणि मागील बाजूस बारा रिव्हर्स गिअर देण्यात आले आहेत.
मॅसी फर्ग्युसन 241 डीआय डायनाट्रॅक ट्रॅक्टरला ऑइल इमरस्ड डीस्क ब्रेक देण्यात आले असून, जे शेतीतील काम करताना ट्रॅक्टरवर चटकन नियंत्रण मिळवण्यास मदत करतात. तसेच या ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टेरिंग देण्यात आली आहे. या ट्रॅक्टरची डिझेल टाकीची क्षमता ही 47 लिटरची असून, या ट्रॅक्टरमध्ये 12v 75AH क्षमतेची बॅटरी आहे. तसेच या ट्रॅक्टरला अधिक आयुष्यासाठी 4 व्हील ड्राईव्ह देण्यात आले आहेत.
किती आहे किंमत?
मॅसी फर्ग्युसन 241 डीआय डायनाट्रॅक ट्रॅक्टरची किंमत शेतकऱ्यांना परवडेल, अशी असून भारतीय बाजारपेठेचा विचार केला. तर देशभरात या ट्रॅक्टरची शोरूम किंमत सहा लाख 70 हजार रुपये ते सात लाख 20 हजार रुपयांपर्यंत आहे. या ट्रॅक्टरचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मॅसी ट्रॅक्टर कंपनी प्रत्येक ग्राहकास मॅसी फर्ग्युसन 241 डीआय डायनाट्रॅक ट्रॅक्टरच्या मॉडेलवर चार हजार तास किंवा चार वर्षापर्यंतची वारंटी देते.