Poultry Farming : ‘प्रतापधन कोंबडी’ पाळा; पोल्ट्री व्यवसायात होईल आर्थिक भरभराट!

Poultry Farming Pratapdhan Chicken Breed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पोल्ट्री व्यवसाय (Poultry Farming) हा सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक आशेचा किरण असून, व्यवस्थित नियोजन आणि चिकाटीने करण्याची तयारी असली तर पोल्ट्री व्यवसाय खूप आर्थिक समृद्धी देऊ शकतो. पोल्ट्री व्यवसायामध्ये कोंबड्यांच्या जातीची निवड, खाद्य व्यवस्थापन तसेच त्यांचे पाण्याचे व्यवस्थापन व वातावरणानुसार त्यांची देखभाल ((Poultry Farming) या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात.

मात्र, या सर्वांमध्ये कोंबड्यांची निवड ही सर्वात महत्वाची ठरते. गावरान कोंबड्यांच्या खूप जाती असून, जातीपरत्वे त्यांची उत्पादनक्षमता व अंडी देण्याची क्षमता देखील वेगवेगळी आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण कोंबडीच्या ‘प्रतापधन कोंबडी’ या प्रजातीबद्दल (Poultry Farming) जाणून घेणार आहोत.

‘प्रतापधन कोंबडी’ फायदेशीर जात (Poultry Farming Pratapdhan Chicken Breed)

पोल्ट्री व्यवसायामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी महाराणा प्रताप कृषी आणि प्रोद्योगिकि विश्वविद्यालय, उदयपूर यांनी कोंबडीची ही जात विकसित केली असून, तिचे नाव प्रतापधन असे ठेवण्यात आले आहे. आपल्याकडे पोल्ट्री व्यवसाय हा भूमिहीन मजूर किंवा कमीत-कमी शेती असणारे शेतकरी करतात. अगदी कमी जागा, कमीत कमी भांडवल असेल तरीही अगदी सहजतेने हा व्यवसाय करून, कमीत-कमी उत्पादन खर्चात या व्यवसायातून अधिक नफा मिळवता येणे शक्य आहे.

किती देते अंडी?

देशी कोंबड्यांचा विचार केला तर एका वर्षात 83 अंडी देतात. परंतु, ही कोंबडीची जात एका वर्षाने 161 अंडी देते. ग्रामीण भागामध्ये अगदी सहजतेने या कोंबडीचे पालन करता येते. जर, आपण अंडी देण्याच्या बाबतीत गावरान जातीच्या कोंबड्यांचा विचार केला तर त्या केवळ 38 दिवसात अंडी देतात. एका वर्षाला 50 ते 60 अंडी देऊ शकतात. हे प्रमाण एकूण उत्पादनाच्या केवळ 21 टक्के आहे. परंतु, प्रतापधन ही जात गावरान कोंबड्यांच्या तुलनेमध्ये तीन पट अधिक अंडी देते. तसेच तिचे वजन 75 टक्‍क्‍यांपर्यंत अधिक असते. त्यामुळे आता तुम्हीही पोल्ट्री व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर ‘प्रतापधन’ प्रजातीची कोंबडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे.