Monsoon Update: केरळमध्ये 31 मे रोजी होणार नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन! हवामान विभागाचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात 31 मे रोजी नैऋत्य मोसमी पावसाचे (Monsoon Update) केरळ किनारपट्टीवर (Kerala Monsoon) आगमन होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा 4 दिवस लवकर मॉन्सून (Monsoon) दाखल होणार असून उष्ण आणि शुष्क हवामानापासून (Monsoon Update) नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

नैऋत्य केरळ किनारपट्टीवर प्रथम मॉन्सून (Monsoon Update) धडकणार आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला होता परंतु यावर्षी ला निनाच्या (La Nina) सक्रियतेमुळे भारतात सरासरीहून अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

गेल्या काही दिवसात भारतात काही ठिकाणी भयंकर उकाडा तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकर्‍यांचे सर्वात जास्त नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी आता मोठ्या आशेने खरीप हंगामाकडे डोळे लावून बसलेला आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या (Monsoon Update) लवकर आगमनाने नागरिकांसह शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

दरवर्षी 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होणारा मॉन्सून जुलैच्या मध्यापर्यंत संपूर्ण देशात पसरतो आणि शेतकरी तांदूळ, मका, कापूस, सोयाबीन पिकांची लागवड सुरु करतात.

भारतातील जवळपास निम्म्याहून अधिक शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेतीला पाणी देण्यासाठी, जलाशय आणि जलचरांचे पुनर्भरण तसेच खरीपाच्या पेरण्याही जून ते सप्टेंबरच्या पावसावर अवलंबून आहेत.

सध्या निवडणुकीचे वातावरण असले तरी राज्यात खरीप (Kharif) पूर्व तयारीला जोर आलेला आहे. शेतकर्‍यांना बियाणे उपलब्ध करून देणे तसेच खरीप कर्ज उपलब्ध करून देणे यामुळे शेतकर्‍यात सुद्धा लगबग सुरु आहे. त्यातच हवामान विभागाने मॉन्सूनबाबत दिलेली ही बातमी शेतकर्‍यांना सुखावणारी आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.