हॅलो कृषी ऑनलाईन: कापूस वेचणी (Cotton Research) सोयीस्कर व्हावी यासाठी पानगळतीसाठी महत्त्वाचे ठरणारे ‘डिफॉलिएंट’ (Defoliant) विकसित करण्यात नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेला (CICR) यश आले आहे. भारतात सद्यस्थितीत ‘डिफॉलिएंट’ प्रकारातील एकही घटक नोंदणीकृत नसल्याने हे संशोधन (Agriculture Research) महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
कापूस वेचणी यंत्राद्वारे (Cotton Harvesting Machine) करण्यासाठी पिकांची पानगळती होणे गरजेचे आहे. त्यामुळे हे संशोधन कापूस (Cotton Research) पिकातील यांत्रिकिकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल समजले जाते.
संशोधनामागे काय कारण? (Cotton Research)
- भारतात कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढत आहे.
- यंत्राद्वारे वेचणीसाठी पानगळत (डिफोलिएशन) आवश्यक आहे.
- भारतात अद्याप ‘डिफॉलिएंट’ नोंदणीकृत नसल्याने यांत्रिकीकरणाला अडथळा निर्माण होत होता.
संशोधन संस्थेचे यश काय आहे?
- केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने यंत्राद्वारे वेचणीसाठी ‘डिफॉलिएंट’ विकसित केले आहे. हे डिफॉलिएंट एका संप्रेरकावर (हार्मोन) आधारित आहे.
- हे रसायन पान गळतीसोबतच परिपक्व होण्याच्या अवस्थेत असलेले बोंड उघडण्यासही सहाय्यभूत ठरते.
- याचा वापर कापसाच्या तंतूंची गुणवत्ता आणि मातीच्या आरोग्यावर परिणाम करत नाही.
- कमी तापमानातही (15 अंश सेल्सिअस) हे डिफॉलिएंट प्रभावी आहे.
संशोधनाचा फायदा (Cotton Research)
- कापूस पीक (Cotton Crop) व्यवस्थापनात मजुरी खर्च कमी होण्यास मदत होईल.
- कापूसवेचणीची क्षमता वाढेल.
- कापूस यांत्रिकीकरणाला चालना मिळेल.
- कापूस उत्पादकता (Cotton Production) वाढीसाठी मदत होईल.
‘डिफॉलिएंट’ च्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली जातील. शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल, तसेच ‘डिफॉलिएंट’ च्या व्यावसायिक उत्पादनासाठी प्रयत्न केले जातील.
भारतीय कृषी क्षेत्रात संशोधन (Cotton Research) आणि विकासासाठी मोठी क्षमता आहे. ‘डिफॉलिएंट’ सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कापूस उत्पादन शेतकऱ्यांसाठी अधिक कार्यक्षम आणि शाश्वत बनवू शकतो.