हॅलो कृषी ऑनलाईन: शेती व्यवसायाला पूरक नर्सरी उद्योगाला (High-tech Nursery) सध्या चांगलेच महत्व प्राप्त झाले आहे. कारण आता शेतकरी चांगले आणि रोगमुक्त उत्पादन मिळवण्यासाठी दर्जेदार बियाणे आणि रोपे (Quality Seeds And Seedlings) यांना प्राधान्य देत आहेत. याचा फायदा जसा शेतकर्यांना होत आहे तसा नर्सरी चालकांना (High-tech Nursery) ही होत आहे.
आजपर्यंत पारंपरिक पद्धतीत अडकलेला या उद्योगाला आता नवीन तंत्रज्ञानामुळे हायटेक (High-tech Nursery) स्वरूप प्राप्त झाले आहे. आता या नर्सरीमधून अधिक सक्षम, उत्तम गुणवत्तेची रोपे निर्मिती केली जात आहे
रोपवाटिका- शेतीपूरक जोडव्यवसाय (High-tech Nursery)
आज शेतकरी असो की नोकरदार प्रत्येकाला एखादा जोडव्यवसाय (Agribusiness) असावा असे वाटते. महाराष्ट्र आणि इतर राज्यातून रोजगार हमी योजना, औषधी वनस्पती वृद्धी योजना, फळबाग लागवड योजना, वृक्ष लागवड योजना, यासारख्या योजना राबवल्या जात आहेत. कोरडवाहू फळ पिके, क्षारयुक्त जमिनीत वृक्ष लागवड, डोंगर उतारावर लागवड, यामध्ये वाढ होत आहे आणि यामुळे रोपवाटिकेची (Crop Nursery) गरज वाढत आहे. आज मागणी आणि पुरवठा यात बरेच अंतर आहे. त्यामुळे नर्सरी व्यवसाय (Nursery Business) हा भविष्यात अधिक चांगली आणि शाश्वत संधी असलेला व्यवसाय आहे.
रोपवाटिका प्रस्थापित करताना महत्त्वाच्या बाबी (Important Points For High-tech Nursery)
रोपवाटिका प्रस्थापित करताना खालील मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे.
- कोणत्या प्रकारची रोपवाटिका प्रस्थापित करावयाची आहे?
- मातृ वृक्ष कोणते असावे
- किती कलमे रोपे उत्पादित करावयाची आहे?
- किती जमीन हवी आहे? खुंटू रोपे वाढविण्यास जागा किती लागणार?
- पाणी, वीज, आणि रोपवाटिकेसाठी मजूरांची उपलब्धता कशी आहे?
- कलम हार्डनिंग करणे
पिकांची अभिवृद्धी करण्यासाठी लागणारे खुंट रोपे
- चिकू – खिरणी
- पेरू – सफेदा, फ्लोरिडा
- आंबा – गोवा, बेल्लरी, ओलर, चंद्रकरन
- लिंबूवर्गीय फळे – जंबेरी, रंगपुर लाईम
- द्राक्ष – डॉगरीज
महत्त्वाच्या पिकांची अभिवृद्धी पद्धत (Crop Propagation Method)
- आंबा – कोई कलम, शेंडा कलम
- चिकू – भेटकलम, दाब कलम
- द्राक्षे – डोळे भरणे, फाटे कलम
- पेरू – दाब कलम,
- केळी – मुनवे, कंद
- सर्व भाजीपाला – बियांपासून
- पपई, नारळ, सुपारी – बियांपासून
रोपवाटिका संबंधित अनुदानाची माहिती (Nursery Subsidy)
राष्ट्रीय बागवानी मंडळ – प्रकल्प किमतीच्या 20% अनुदान कर्जाची संलग्न अनुदान रुपये 25 लक्ष पर्यंत चार हेक्टर क्षेत्रासाठी.
एकात्मिक बागवानी विकास अभियान – चार हेक्टर क्षेत्राच्या हायटेक नर्सरी साठी रुपये 25 लक्ष हेक्टरी असा खर्च अपेक्षित धरून प्रकल्प किमतीच्या चाळीस टक्के अनुदान दिले जाते . जास्तीत जास्त अनुदान रुपये चाळीस लक्ष प्रति रोपवाटिका. मुख्य अट कमीत कमी पन्नास हजार कलमे प्रति वर्ष हेक्टरी तयार करणे आवश्यक आहे.
लघु रोपवाटिका – 1 हेक्टर क्षेत्रासाठी रुपये 15 लाख असा खर्च अपेक्षित आहे आणि त्यासाठी कमीत कमी रुपये साडेसात लाख प्रति रोपवाटिका असे अनुदान दिले जाते. मुख्य अट कमीत कमी 25000 कलमे प्रति वर्ष हेक्टरी तयार करणे आवश्यक आहे.
रोपवाटिकेचे आधुनिकीकरण करण्यासाठीच्या अनुदान (Subsidy For Modernization Of Nursery)
4 हेक्टर क्षेत्रासाठी रुपये दहा लक्ष पर्यंत अनुदान दिले जाते खाजगी रोपवाटिका धारकासाठी 50 टक्के म्हणजेच चार हेक्टर क्षेत्रासाठी रुपये पाच लक्ष पर्यंत अनुदान दिले जाते.
रोपवाटिका व्यवस्थापन करताना लक्षात ठेवायचे मुद्दे (High-tech Nursery)
- रोपवाटिकेचे (High-tech Nursery) व्यवस्थापन करताना मागणीनुसार पुरवठा, रोग किडींचे नियंत्रण विक्री पश्चात् सेवा, मार्केटिंग. नर्सरी टाकण्याआधी कोणत्या भागात कोणते पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते कोणत्या प्रकारची फळझाडे व भाजीपाला पिके आहेत याचा विचार करून नर्सरीची उभारणी करायला हवी उदाहरणार्थ. कोकणात आंबे, नारळ, सुपारी, काजू ,कोकम, यांच्या रोपवाटिका पाहिजेत, पश्चिम महाराष्ट्रात मोसंबी, लिंबू ,बोर ,डाळिंब विदर्भात संत्रा, मराठवाड्यात संत्रा मोसंबी संदेशात केळी असे प्रत्येक भागानुसार तिथल्या जातीच्या फळांच्या रोपवाटिका असल्यास वाहतुकीचा खर्च कमी होतो.
- रोपवाटिका शास्त्र शुद्ध पद्धतीची असावी रोपांचे संगोपन करायला प्रशिक्षित माणसाची नियुक्ती करावी.
- एक चांगले शेड हाऊस किंवा ग्रीन हाऊस उभारून त्याला चांगल्या प्रकारचे कल्चर वापरून प्लास्टिकच्या ट्रेमध्ये बियाण्यांची उगवण करावी ग्रीन हाऊस व शेड हाऊस मध्ये बियाण्यांची उगम शक्ती जास्त असते.
- रोपवाटिकेत (High-tech Nursery) वायुवीजन नियंत्रित करता येण्याची सोय असावी, यामुळे रोपांची वाढ निरोगी व चांगली होते.
- गादी वाफेवर कलम किंवा बियाणे उगवण्याऐवजी कोकोपीट वापरून ट्रे मध्ये रोपे किंवा कलमे तयार करावीत, यामुळे मातीमधील जीवाणूजन्य रोगांना प्रतिबंध करता येतो.
- एकदा रोपे तयार झाल्यानंतर त्यांची वाहतूक व्यवस्थित होईल अशी काळजी घ्यावी अन्यथा रोपांना हानी होऊ शकते.
- रोपे विक्रीनंतर शेतकर्यांना सेवा पुरविणे गरजेचे आहे, यासाठी संपूर्ण तांत्रिक माहिती पुरवावी. यामुळे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होऊन, रोपवाटिका नावा रूपाला येते, उत्पादनात वाढ होते.
- ऊती संवर्धन तंत्रज्ञान वापरून चांगल्या प्रतिची आणि गुणवत्तेची रोपे तयार करावी.
रोपवाटिकेची मार्केटिंग (Nursery Marketing)
- कोणत्याही व्यवसायात मार्केटिंगला खूप महत्व आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रोपवाटिका रस्त्यापासून जवळ किंवा रोडला लागून असावी, जेणेकरून ग्राहकांची गैरसोय होणार नाही.
- ऑनलाइन पद्धतीने तुमची वेबसाईट बनवून तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करून घरपोच सेवा देखील देऊ शकता.
- आसपासच्या गावांमध्ये जाऊन तुमच्याकडे उपलब्ध असणार्या रोपांची त्यांच्या जातीची माहिती देऊन मार्केटिंग करू शकता, गुणवत्तापूर्ण आणि निरोगी रोपांना बाजारात नेहमीच किंमत असते.