Farmer Success Story: बंगाली वांग्याची व्हरायटी वापरली, शेतकर्‍याने लाखोची कमाई केली!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीचे यश (Farmer Success Story) वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. त्यातले एक महत्वाचे घटक म्हणजे बियाणे. चवदार, जास्त उत्पादन देणारे वाण (High Yielding Variety) हे शेतकर्‍यांच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावते. जर शेतकर्‍याने योग्य वाण (Crop Variety) लावलं आणि चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर अगदी कमी खर्चात शेतकरी चांगले पैसे कमावू शकतो, हे सिद्ध केले आहे बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील ठाढा गावातील रहिवासी राजेश कुमार यांनी (Farmer Success Story).

वांग्याच्या शेतीतून (Brinjal Farming) हा शेतकरी मालामाल झाला आहे. तर मग हा शेतकरी वांग्याची नेमकी कोणती व्हरायटी वापरतो, ते बियाणं कुठून आणतो याबाबत जाणून घेऊ या.

राजेश कुमार (Rajesh Kumar) मागील 3 वर्षांपासून ते वांग्याची शेती करत आहेत. हे वांगे बंगाल (Bengal Brinjal Variety) व्हरायटीचे ब्लू वांगे आहेत. ही वांगी वर्षभर येतात, यामुळे चांगले उत्पादन होते. त्यामुळे वांग्याच्या शेतीतून  चांगला नफा कमावत आहेत (Farmer Success Story).

राजेश कुमार हे त्यांचा अनुभव आणि अभ्यासाने शेती करतात. आतापर्यंत मला कधीही नुकसान झालेले नाही. तसेच प्रत्येक वेळी मी चांगला नफा कमावतो. आता शेतीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांच्या बळावरच मी माझा आर्थिक विकास करत आहे, असे ते अभिमानाने सांगतात (Farmer Success Story).

सध्या ते विविध प्रकारच्या हंगामी भाज्यांचीही लागवड करतात. यावेळी त्यांनी आपल्या अडीच बिघा पेक्षा जास्त शेतीत ब्लू वांगे बंगाल जातीची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी बाहेरून बियाणे मागवले आणि त्याची लागवड केली. विशेष म्हणजे वांग्याची शेती ही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीवर (Organic Brinjal) आधारित आहे.

राजेश कुमार सांगतात की, त्यांच्या शेतातील वांग्याचा आकार 12 इंचपर्यंत असतो. वांगी खायला खूप चविष्ट आणि वजनदार असतात. वांग्याची शेती करणे इतर शेतकर्‍यांसाठी कठीण असते. जास्त मेहनत लागल्याने अनेक शेतकरी यात यशस्वी होत नाही. मात्र, वांग्याची शेती करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव वांग्यांवर पडू नये यासाठी वेळोवेळी औषध फवारणी करणे महत्त्वाचे आहे.

50 हजार खर्चात, 5 लाखांपेक्षा जास्त नफा (Farmer Success Story)

राजेश कुमार सांगतात की, त्यांच्या शेतात दररोज 2 क्विंटलपेक्षा जास्त वांग्याची तोडणी केली जाते. दररोज ही वांगी पूर्णिया येथील बाजारात विकली जातात. या वांग्यांना 40 ते 50 रुपये प्रति किलो भाव मिळतो. वांग्याच्या शेतीत त्यांना  50 हजार रुपये खर्च आला. वांग्याच्या विक्रीतून त्यांना वर्षभर 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न (Farmer Success Story) मिळण्याची शक्यता आहे.