हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या नाशिकमध्ये भाजीपाल्याचे दर (Vegetable Price) गगनाला भिडलेले दिसत आहेत. विशेषत: पालेभाज्यांच्या किमतीत (Vegetable Price) मोठी वाढ झालेली आहे.
उन्हाळा संपत आला असून येत्या जून महिन्यापासून पावसाला सुरू होत आहे. परंतु सध्या मे महिन्यातील कडक उन्हाचा परिणाम हा शेतकर्यांच्या पिकांवर झाला आहे. नाशिकमध्ये भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. त्यामध्ये कोथिंबीर (Kothimbir Rate) ही भाजी 75 रु प्रती जुड तर मेथीची भाजी 50 रु प्रति जुडी (Methi Bajar Bhav) या भावाने विकली जात आहे. शेतकर्यांसाठी ही आनंदाची बातमी असली तरी त्यामुळे गृहिणीचे भाजीपाल्याचे रोजचे बजेट कोलमडले आहे. शहरातील विविध भाजी बाजारात भाजीपाल्याच्या दरात (Vegetable Price) मोठी वाढ झाल्याने शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळत आहे.
उत्पादनात घट झाल्याने, बाजारभाव वाढले
सध्या उन्हाळा संपत आला असला तरी शेतकर्यांच्या पिकांना पाणी कमी पडत आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यामध्ये कोथिंबीर पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु पाणी टंचाई असल्यामुळे मार्केटमध्ये कोथिंबीरीसह इतर पालेभाज्यांची (Leafy Vegetable Rate) आवक घटली आहे. त्यामुळे बाजार भावांमध्ये (Vegetable Price) वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
मार्केटमध्ये 50 टक्के भाज्यांची आवक
नाशिकसह जळगाव, धुळे, मालेगाव या उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात पाण्याची टंचाई भासत आहे. यामुळे अद्यापही शेतमालाची आवक देखील बाधित झाली आहे.
नियमित होत असलेल्या आवकेच्या तुलनेत अवघी 50 ते 60 टक्के आवक सध्या सुरू असल्याने भाजीपाल्याचे दर कडाडलेले आहेत. पालेभाज्या तर मिळेनाशा झाल्या आहेत. ज्या थोड्याफार पालेभाज्या उपलब्ध होत आहेत. त्यांचे दरही (Vegetable Price) जास्त असल्याचे चित्र आहे.