Dairy Farming : ‘हे’ घरगुती उपाय करा; गाईच्या खाद्यावरील खर्च वार्षिक 9 हजाराने कमी होईल!

Dairy Farming Tips For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दुग्ध व्यवसायाने मोठा आधार दिला आहे. मात्र, दुग्धव्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ऋतुमानानुसार दूध उत्पादनात होणारी घट, कमी झालेले दुधाचे दर आणि दुधाची उत्पादन क्षमता यावर मात करत दूध उत्पादक शेतकरी (Dairy Farming) तग धरून हा व्यवसाय करत असतात.

पशुखाद्यावर भरमसाठ खर्च (Dairy Farming Tips For Farmers)

दुग्ध व्यवसाय (Dairy Farming) करताना शेतकऱ्यांचा पशुधन सांभाळण्यासाठीचा खर्च भरमसाठ वाढला आहे. त्यातुलनेने शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न खूपच कमी असते. यात प्रामुख्याने वाढत्या महागाईमुळे जनावरांच्या खाद्यावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांना सांभाळणे देखील कठीण झाले आहे. पण जनावरांच्या खाद्यावर होणारा खर्च आपण घरगुती उपायांतून करू शकतो. याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

काय आहेत ‘हे’ घरगुती उपाय?

शेतकरी आपल्या शेतात फळे, भाजीपाला, अन्नधान्य पिकवतो. पण त्यातील बरेच अन्न, भाजीपाला आणि खराब फळे वाया जातात. भारतात वाया जाणाऱ्या अन्नाची किंमत ही वर्षाकाठी 13 हजार कोटी रूपये इतकी आहे. वाटाणा, गाजर, मेथी अशा अनेक भाज्या आपण खाल्ल्यानंतर त्यांचा उर्वरित भाग फेकून दिला जातो. आपल्याला खाण्यायोग्य नसलेले अन्न फेकून न देता गाईला किंवा इतर जनावरांना खाऊ घातले तर एका गाईचा वर्षाकाठी कमीत कमी 2 हजार 500 ते 5 हजारापर्यंत खर्च वाचू शकतो. असा प्रयोग करून काही शेतकऱ्यांना एका गाईच्या खर्चात वर्षाकाठी 9 हजारांची बचत केली असल्याचे समोर आल्याचे अनेक शेतकरी सांगतात.

प्रामुख्याने कच्चा माल, खाद्य आणि चाऱ्याच्या वाढत जाणाऱ्या किमती यामुळे दूध उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. मात्र, अशा वेळी घरच्या घरी केलेल्या या उपाययोजनांमुळे तुम्हाला देखील पशुआहारावरील खर्च कमी होण्यास नक्कीच मदत होईल.